अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे सह्याद्री देवराईच्या माध्यमातून राज्यभर वृक्षारोपण करतात. त्यांचे मोठे काम आहे. साईबाबांचा प्रसाद, सिद्धीविनायक बाप्पाचा प्रसाद दिला जातो. तसा, प्रसाद म्हणून रोपटं दिलं जावं असं आम्हाला त्यांनी सांगितले. सयाजीराव राज्यभर पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील”, अशी घोषणा अजित पवारांनी केली. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज (दि.११) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल आदी. उपस्थित होते. (Sayaji Shinde)

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वागत केले. सयाजी शिंदे यांनी अनेक चित्रपट, नाटकात काम केले आहे. तसेच त्यांनी फक्त मराठी नाही तर हिंदी, तेलगू, तमिळ चित्रपटांमध्येही मोठे काम केले आहे. सामाजिक कार्यामुळेदेखील ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी स्वत:हून पुढे येत लाखो झाडे लावली आणि त्यांना मोठे केले. त्यांनी निर्माण केलेल्या सह्याद्री देवराईचं सर्वत्र कौतुक झाले. सयाजी शिंदे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशामुळे पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पक्ष प्रवेशावर म्हणाले “सयाजी शिंदे खडतर परिस्थितून पुढे आले आहेत. त्यांनी सिनेक्षेत्रात अद्वितीय स्थान निर्माण केले आहे. मराठी मनाला अभिमान वाटावे असे त्यांचे कार्य आहे. त्यांनी आपल्याला सीमित ठेवलं नाही. त्यांनी पर्यावरणावर चांगलं काम केले आहे” (Sayaji Shinde)

“मराठी माणूस असूनही त्यांनी पहिल्यांदा झेंडा रोवला तो दाक्षिणात्य सिनेमापासून. मला त्यांचे मोठे आश्चर्य वाटते. रजनीकांत आणि सयाजी यांना त्यांची भाषा कशी समजते, ते कसं काम करतात हे मला कळत नाही. त्यांनी कठिण गोष्टी केल्या. आता राजकारणात त्यांना कठिणाई वाटणार नाही”, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ