महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला अजित पवार यांच्यासह राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा करण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. ते काय भूमिका घेणार याकडेही सर्वांचं लक्ष आहे. (Ajit Pawar)
महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक घटना घडत आहेत. अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर येत आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या पत्रकार परिषदेला महत्त्व प्राप्त झालं आहे. तसंच विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाला महायुतीत सर्वात कमी जागा मिळत असल्याने नेत्यांमध्ये नाराजी आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. परिणामी, अजित पवार एखादा मोठा निर्णय जाहीर करतील अशी चर्चा आहे.
हेही वाचा :