Home » Blog » बर्थ डे गर्ल लवलिनाचा बॉक्सिंगमध्ये सुवर्णपंच

बर्थ डे गर्ल लवलिनाचा बॉक्सिंगमध्ये सुवर्णपंच

by प्रतिनिधी
0 comments
Birthday girl Lovlina lands a 'golden punch' in boxing

नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारताच्या लवलिना बोरगोहोनाने ७५ किलो वजनी गटात बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले. आज तिचा वाढदिवस असून तिने देशाला सुवर्णपदकाची भेट दिली. अशियाई क्रीडा स्पर्धेत मेरी कोमनंतर बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवून देणारी ती दुसरी भारतीय ठरली आहे. (Birthday girl Lovlina lands a ‘golden punch’ in boxing)

नागोवा अशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंग अंतिम फेरीत २९ वर्षीय लवलिना चीनच्या झीयी बाओचाशी भिडली. तिने बावोचा ५-० असा पराभव करत सुवर्ण पदक पटकावले. लवलिना आत्मविश्वासाने अंतिम फेरीत रिंगमध्ये उतरली. पहिली फेरीत तिने ३-२ ने जिंकून झकास सुरुवात केली. दुसऱ्या फेरीत प्रतिस्पर्धी बाओने आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे लव्हलिनाने बचाव स्वीकारल्या. रिंगच्या मधोमध दोघींमध्ये जोरदार ठोसाठोसी झाली. तिने ही फेरी ४-१ ने जिंकून स्वत:ची आघाडी २-० अशी वाढवली. अंतिम फेरीत तिने संयमाचे दर्शन घडवताना प्रतिस्पर्धी बावोला डोके वर काढून दिले नाही. तिसरा सेट तिने ४-१ असा जिंकून ५-० एकतर्फी मात करत लवलिनाने सुवर्णपदकावर नाव कोरले. (Birthday girl Lovlina lands a ‘golden punch’ in boxing)

लवलिना मेरी कोमच्या पक्तींत येऊन बसली आहे. २०२४ मध्ये इंचिओन येथे झालेल्या अशियाई स्पर्धेत मेरी कोमने फ्लायवेट गटात सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर बारा वर्षानंतर लवलिनाने सुवर्णपदक पटकावले. (Birthday girl Lovlina lands a ‘golden punch’ in boxing)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!