Home » Blog » मोदींकडून फुटीर शिवसेना, तृणमुल खासदारांना दिलासा

मोदींकडून फुटीर शिवसेना, तृणमुल खासदारांना दिलासा

by प्रतिनिधी
0 comments
Modi's meeting with Shiv Sena and TMC MPs

नवी दिल्ली : तृणमुल काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातून फुटलेल्या खासदारासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी बैठक घेऊन संवाद साधला. “काळजी करु नका, मी तुमच्याबाहेर आहे”, असा दिलासा दिला. लोकसभेत सुरू असलेल्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी यावेळी चिंता व्यक्त केली. पुढील आठवड्यात डीलिमेटेशन बिल मंजूर करण्यासाठी तीन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी फुटीर खासदारांसोबत चर्चा केल्याची चर्चा व्यक्त केली जात आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन खासदारही उपस्थित होते. (Modi’s meeting with Shiv Sena and TMC MPs)

४५ खासदारांची उपस्थिती

पंतप्रधान मोदींनी संवाद साधला तेव्हा ४५ खासदार उपस्थित होते. त्यामध्ये तृणमुल काँग्रेसमधून फुटून राष्ट्रीय सिटीजन पार्टीमध्ये प्रवेश करणारे फुटीर २० खासदार उपस्थित होते. तसेच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सात खासदार उपस्थित होते. त्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटातून फुटलेल्या सहा खासदारांचा समावेश होता. फुटीर खासदारांना संवाद साधताना त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. (Modi’s meeting with Shiv Sena and TMC MPs)

प्रत्येक खासदाराचा आदर राखला जाईल

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी तुमच्याबरोबर आहे. काळजी करु नका. एनडीए हे एक कुटुंब आहे. छोट्या मोठ्या पक्षांनी एकत्र घेऊन ही युती झाली आहे. प्रत्येकाचा आदर राखला जाईल. त्यांना संधी दिली जाईन. मी प्रत्येक खासदाराबरोबर आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही”. मतदारसंघात कामे करण्यासाठी अधिकारांचा योग्य वापर करा अशी सूचनाही त्यांनी केली. (Modi’s meeting with Shiv Sena and TMC MPs)

You may also like

error: Content is protected !!