नवी दिल्ली : अयोध्यातील मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम मंदिरातील दानपेटीतील चोरी आणि गैरव्यवहाराची नवीन माहिती पुढे येत असून उत्तर प्रदेश पोलिसांकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि अध्यक्ष अनिल मिश्रा यांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत. दोघांनी नुकतेच आपल्या पदाचे राजीनामे निदले आहेत. गुरुवारी २५ जून रोजी एफआयआर दाखल करण्यात आला असून आठ संशयितांना अटक केली आहे. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. (Police to question Champat Rai and Mishra)
पोलिसांनी आठ संशयितांच्या घरावर छापे टाकले असून सात संशयित आरोपीकडून ७९ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. अविनाश शुक्ला याच्या घरातून वीस लाख रुपये जप्त केले आहेत. तो कौशलपुरी येथील भाड्याच्या घरात रहात आहे. पोलिसांनी दान मोजणारे कर्मचारी अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, मनीष कुमार यादव, करुणेश पांडे, रामशंकर मिश्रा, पर्यवेक्षक सुभाष श्रीवास्तव, महासचिव चंपत राय यांचा वाहनाचा चालक रामशंकर उर्फ टिन्नू यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
संशयित बावीस वर्षीय अनुकल्प मिश्रा याची चौकशीत पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्याचा पगार १५ हजार रुपये आहे. पण त्याने अयोध्यात ६५ लाख किंमतीचे घर आहे. त्याने मुळ गावी बावसा येथे फॉर्म हाऊस बांधले आहे. तसेच एक लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीची बाईक आहे. नुकतीच त्याने महिंद्रा स्कॉर्पिओ बुक केली आहे. (Police to question Champat Rai and Mishra)
राम मंदिर दान चोरीप्रकरणी समाजवादी पक्षाने भाजपच्या योगी सरकारवर आरोप केले आहेत. त्यानंतर सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. एसआयटीच्या तपात रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने असा तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयांचा मुद्देमालाची नोंद नसल्याच माहिती पुढे आली आहे.
संशयितांकडून ७९ लाख रुपये जप्त
पोलिसांनी आठ संशयितांच्या घरावर छापे टाकले असून सात संशयित आरोपीकडून ७९ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. अविनाश शुक्ला याच्या घरातून वीस लाख रुपये जप्त केले आहेत. तो कौशलपुरी येथील भाड्याच्या घरात रहात आहे. पोलिसांनी दान मोजणारे कर्मचारी अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, मनीष कुमार यादव, करुणेश पांडे, रामशंकर मिश्रा, पर्यवेक्षक सुभाष श्रीवास्तव, महासचिव चंपत राय यांचा वाहनाचा चालक रामशंकर उर्फ टिन्नू यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
पगार १५ हजार, घर ६५ लाखाचे
संशयित बावीस वर्षीय अनुकल्प मिश्रा याची चौकशीत पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्याचा पगार १५ हजार रुपये आहे. पण त्याने अयोध्यात ६५ लाख किंमतीचे घर आहे. त्याने मुळ गावी बावसा येथे फॉर्म हाऊस बांधले आहे. तसेच एक लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीची बाईक आहे. नुकतीच त्याने महिंद्रा स्कॉर्पिओ बुक केली आहे. (Police to question Champat Rai and Mishra)
साडेतीन हजार कोटींची नोंद नाही.
राम मंदिर दान चोरीप्रकरणी समाजवादी पक्षाने भाजपच्या योगी सरकारवर आरोप केले आहेत. त्यानंतर सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. एसआयटीच्या तपात रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने असा तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयांचा मुद्देमालाची नोंद नसल्याची माहिती पुढे आली आहे.
…. आभाळ कोसळणार नाही
दरम्यान राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी सीबीआयच्या नेतृत्वाखाली चौकशी करावी, अशा दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. सुट्टीच्या कालावधीतील न्यायालयाने सोमवारी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. उन्हाळी सुट्टीनंतर न्यायालयाचे नियमित कामकाज सुरू झाल्यावर या प्रकरणाची सुनावणी झाल्यास काही आभाळ कोसळणार नाही असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. (Police to question Champat Rai and Mishra)