नवी दिल्ली : प्रतिनिधी : अयोध्यातील राम मंदिरातून भाजपवाल्यांनी पाच कोटी रुपये चोरले असा सणसणाटी आरोप शिवसेनचे खासदार संजय राऊत यांनी केला. या प्रकरणी उद्धव ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दान पेट्यातून चोरी झाल्याची घटना सीसीटीव्ही दिसून आली. दानपेटीची रक्कम गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पाच लाख रुपये श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने परत आपल्या खात्यावर घेतले आहेत. पोलिस या गुन्ह्याचा तपास करत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार राऊत यांनी भाजपवर टीकेचे आसूड ओढले. (Theft of five crore rupees at the Ram Temple)
श्रीराम मंदिराची जबाबदारी भाजप, आरएसएसकडे
राम मंदिर आणि संपूर्ण ट्रस्टची जबाबदारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक परिवाराकडे आहे. दानपेटी हात घालण्याचे धाडस कोणता हिंदूत्वादी करु शकेल? असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. राम मंदिराला अतिरेक्यापासून धोका आहे हे सांगितले जाते मग हे अतिरेकी कोण? हे प्रकरण बाहेर आल्यावर सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले. मंदिरात पाच कोटी रुपये चोरणारे भाजपवालेच आहेत, असा दावाही त्यांनी केला. (Theft of five crore rupees at the Ram Temple)
मंहत गोपाल दास गप्प का?
दोनपेटीतील देणगीचा अपहार झाल्याची माहिती कळल्यापासून उद्धव ठाकरे आणि आम्ही अस्वस्थ आहोत. शिवसेनेने राम मंदिर उभारणीला एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. आम्ही उघड दान केले होते. पण दोन पेटीतील पैसे वारंवार कोण पळवते आहे, याची चौकशी का होत नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नरेंद्र मोदी यांनी मंदिर प्रतिष्ठापनेचे राजकारण करुन भाजपला मते मागितली. आता ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास गप्प का आहेत? असा सवालही विचारला.
बाहुबली बृजभूषण सिंह यांना वाटते भिती
बाहुबली बृजभूषण सिंह यांनी आपल्याकडे सर्व माहिती असून यात मोठी लोक आहेत. मी बोललो तर माझ्या जिवाला धोका निर्माण होईल असे वक्तव्य केले आहे. बाहुबली बृजभूषण जर भिती वाटत असेल तर हा अत्यंत गंभीर विषय आहे, असेही राऊत म्हणाले. (Theft of five crore rupees at the Ram Temple)