चंद्रपूर : सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस पक्षाला संधी असतानाही भाजपने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला गळाला लावत भाजपने चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपने सत्ता खेचून आणली. भाजपच्या संगीता खांडेकर एक मत जादा मिळवून महापौरपदी निवडून आल्या. भाजप उमेदवाराला ३२ तर काँग्रेस उमेदवाराला ३१ मते मिळाली. मतदानाच्यावेळी वंचितचे नगरसेवक गैरहजर राहिले तर एमआयएमच्या नगरसेवकाने तटस्थ भूमिका घेतली. (BJP’s Sangeeta Khandekar Mayor)
चंद्रपूर महानगरपालिकेत ६६ सदस्यांच्या संख्येते बहुमताचा आकडा ३४ होता. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे २७, भाजप २३, शिवसेना शिंदे गट १, शिवसेना उद्धव ठाकरे गट ६, बीएसपी १, वंचित बहुजन २, एमआयएम १ आणि अपक्ष पाच नगरसेवक आहेत. महापौरपदासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेने उद्धव ठाकरे पक्षाची भूमिका महत्वाची होती. भाजप आणि काँग्रेसकडून शिवसेनेची मनधरणी सुरू होती. आमदार विजय वडेट्टीवार यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी भाजपला शिवसेना मदत करणार नाही असे स्पष्ट केले होते. पण तासाभरात चित्र पालटले. (BJP’s Sangeeta Khandekar Mayor)
चंद्रपुरातील भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांनी ठाकरे गटाशी संवाद साधत भाजप आणि ठाकरे गटाला सव्वा वर्षाचे महापौरपद देण्याचे ठरले. तर पहिल्या आणि चौथ्या वर्षी स्थायी समितीपद देण्याचे ठरले. त्यानंतर भाजप आणि शिवसेना पक्षाची सहमती ठरली. चंद्रपूरमध्ये ठाकरे गटाचे सहा आणि वंचित बहुजन आघाडीला दोन जागा मिळाले आहेत. ठाकरे गट, वंचित आणि अपक्ष दोन नगरसेवकांनी दहा जणांचा स्वतंत्र गट स्थापन केले आहे. (BJP’s Sangeeta Khandekar Mayor)