Home » Blog » मुंबईत विकास लवांडेवरील हल्याच्या निषेधार्थ निदर्शने  

मुंबईत विकास लवांडेवरील हल्याच्या निषेधार्थ निदर्शने  

0 comments
Demonstrations held in Mumbai to protest the attack on Lavande

मुंबई : प्रतिनिधी :  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व संघटक सचिव  विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या शाईफेक हल्ल्याचा निषेधार्थ  प्रदेश कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी हल्लेखोर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या मंत्री नितेश राणे व भाजपाच्या अन्य नेत्यांचा तीव्र निषेध करण्यात आला. त्यांच्या व राज्य सरकारच्या  विरोधात  घोषणानी परिसर दणाणून सोडला. (Demonstrations held in Mumbai to protest the attack on Lavande)

पक्षाच्या प्रवक्त्या व माजी आमदार विद्या चव्हाण, मुंबई विभागीय अध्यक्ष व माजी आमदार मिलिंद  (अण्णा) कांबळे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष सुहेल सुबेदार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन  करण्यात आले. यावेळी पक्षाचे मुंबई विभागीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी  संग्राम भंडारे हे ‘वारकरी नाहीत, तर मारेकरी आहेत’ हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक स्वतःला वारकरी म्हणवताहेत. त्यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. सोबतच, पुरोगामी महाराष्ट्रात असे हल्ले आम्ही सहन करणार नाही असा इशारा देण्यात आला. तसेच, या हल्ल्याला मंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या समर्थनाचाही विद्यात चव्हाण यांनी कडक शब्दांत समाचार घेतला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. (Demonstrations held in Mumbai to protest the attack on Lavande)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00