Home » Blog » DYSP appointment: २६/११ तील शहीद पत्नी बनल्या पोलिस उप-अधीक्षक

DYSP appointment: २६/११ तील शहीद पत्नी बनल्या पोलिस उप-अधीक्षक

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

by प्रतिनिधी
0 comments
DYSP appointment

मुंबई : विशेष प्रतिनिधी : २६/११ च्या मुंबई हल्यातील शहीद पोलिस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना थेट पोलिस उप-अधिक्षकपदी नियुक्ती देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना मंगळवारी (२२ एप्रिल) नियुक्तीपत्र देण्यात आले. (DYSP appointment)

२६/११/ मुंबई दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांशी लढताना कॉन्स्टेबल अंबादास पवार यांच्या पत्नी श्रीमती कल्पना पवार यांना परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षकपदावरील थेट नियुक्तीचे आदेश प्रदान करण्यात आले. ही नियुक्ती करताना मुख्यमंत्री यांनी शहीद पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी असलेली शासनाची कृतज्ञता आणि संवेदनशीलता पुन्हा एकदा प्रत्यक्ष कृतीतून दाखवली आहे.
मुख्यमंत्री यांच्या या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना कल्पना पवार म्हणाल्या, “माझ्या पतीप्रमाणेच मलाही आता देशसेवेची संधी मिळाली आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, लाडक्या बहिणींचे आणि देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या शहीद वीरांचे आहे, हे माझ्या या नियुक्तीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.” (DYSP appointment)

हेही वाचा :
रामदेवबाबांची दिल्ली हायकोर्टाकडून कानउघाडणी
पत्नीने केले ओम प्रकाशांवर बारा वार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00