Home » Blog » ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

by प्रतिनिधी
0 comments
Historian Dr. Jaisingrao Pawar Passes Away

कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे वयाच्या ८५ वर्षी निधन झाले. गेले दीड महिन्यापासून त्यांच्यावर फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याने एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. (Historian Dr. Jaisingrao Pawar Passes Away)

डॉ. जयसिंगराव पवार हे इतिहासाचे प्राध्यापक होते. मराठ्यांचा इतिहास हा त्यांचा अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय होता. इतिहास या विषयातील प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक इतिहासावरील त्यांची क्रमिक पुस्तके विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होती. अध्यापनाबरोबर इतिहास संशोधनावरही त्यांनी भर दिला होता. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, महाराणी येसुबाई या विषयांवर अभ्यास करताना त्यांनी संशोधन करत मराठ्यांच्या इतिहासात नवीन भर टाकली. वस्तुनिष्ठ इतिहास लिखानावर त्यांचा भर होता.

सामाजिक क्रांतीचे प्रणिते राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य जनमाणसात नेण्यासाठी डॉ. पवार अखेरपर्यंत कार्यरत होते.  राजर्षी शाहू महाराजांच्या पंचखंडात्मक स्मारक ग्रंथाचे त्यांनी संकलन केले. हा ग्रंथ अनेक भाषांमध्ये नेण्यासाठी अखेरपर्यंत ते कार्यरत होते. ‘पंचगंगा तिरी’ हे आत्मचरित्रही त्यांनी लिहिले. (Historian Dr. Jaisingrao Pawar Passes Away)

सांगली जिल्ह्यातील तडसर हे डॉ. पवार यांचे मुळ गाव. ३० डिसेंबर १९४१ रोजी शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झालेल्या डॉ. पवार यांचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरातील राजाराम कॉलेज येथे झाले. कोल्हापुरात त्यांना इतिहासाचा गोडी लागली आणि आयुष्यभर व्रतस्थपणे त्यांनी इतिहासावर लिखान केले. शहाजी कॉलेज येथे त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. (Historian Dr. Jaisingrao Pawar Passes Away)

डॉ. जयसिंगराव पवार यांची ग्रंथसंपदा : महाराणी ताराबाई, क्रांतिसिंह नाना पाटील, सेनापती संताजी घोरपडे, संभाजी स्मारक ग्रंथ, मराठेशाहीचा मागोवा, मराठी साम्राज्याचा उदयास्त, शिवचरित्र- एक मागोवा, शिवचरित्रापासून काय शिकावे?, आमच्या इतिहासाचा शोध व बोध, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ, मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध, मराठेशाहीचे अंतरंग, शिवपुत्र छत्रपती राजाराम, छत्रपती संभाजी- एक चिकित्सा, राजर्षी शाहू छत्रपती: जीवन व कार्य, राजर्षी शाहू छत्रपती: एक मागोवा, राजर्षी शाहू छत्रपतींचे जाहीरनामे व हुकूमनामे, राजर्षी शाहू छत्रपती, कर्मवीर भाऊराव पाटील व प्रबोधनकार ठाकरे, राजर्षी शाहू छत्रपतींची भाषणे, राजर्षी शाहू छत्रपती पत्रव्यवहार आणि कायदे, मराठ्यांचा इतिहास खंड १ : शिवशाही, मराठ्यांचा इतिहास खंड २ : पेशवाई,  मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई : खंड १ व २

जयसिंगराव पवार यांना मिळालेले पुरस्कार : जिजामाता विद्वत्त गौरव पुरस्कार, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, कोल्हापूर भूषण पुरस्कार, मालोजी राजे निंबाळकर पुरस्कार, फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार, वीर बाजी पासलकर पुरस्कार, सेनापती प्रतापराव गुजर पुरस्कार, गुरुवर्य शामराव देसाई पुरस्कार, आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार, सत्यशोधक दिनकरराव जवळकर पुरस्कार. (Historian Dr. Jaisingrao Pawar Passes Away)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00