कोल्हापूर : प्रतिनिधी : स्वबळावर सत्ता मिळू शकत नाही म्हणूनच भाजपचे इतर पक्ष फोडण्याच काम करत आहेत. कारण ज्यांची स्वतःची सत्ता मिळवण्याची ताकद नसते तेच लोकांची घरे फोडण्याचा उद्योग करतात असा घणाघाती आरोप काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केला. बापूराम नगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शिवराज पाटील आणि विजयकुमार कांबळे यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.
कोल्हापूर महानगरपालिका नव्याने तयार झालेल्या प्रभाग क्रमांक २० मधील बापूराम नगर मधील सामाजिक कार्यकर्ते शिवराज पाटील, विजयकुमार कांबळे यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. (Shivraj Patil joins Congress)
आमदार सतेज पाटील यांनी भाषणात भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस हे शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून पैसे मिळवण्यात व्यस्त आहेत, एक उपमुख्यमंत्री मुलाला जमीन मिळवून देण्यात व्यस्त आहेत, तर दुसरे उपमुख्यमंत्री ठाकरेंची सेना फोडण्यात व्यस्त आहेत. त्यांना सर्वसामान्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. केवळ सोशल मिडियावरील रिल्सच्या माध्यमातून तरुणांची माथी भडकावून सत्ता काबीज करणे हेच भाजपचे लक्ष्य आहे, आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. जे स्वतःच्या ताकदीवर सत्ता मिळवू शकत नाहीत तेच इतरांची घर फोडण्याचे काम करतात असा टोला देखील यावेळी आमदार पाटील यांनी लगावला. (Shivraj Patil joins Congress)
राजकारणात चढ उतार येत असतात. मात्र कोण कुठे गेलं? याचा विचार आपण करायचा नाही. खऱ्या शिलेदारांना घेऊन सर्वसामान्यांच्या हितासाठी लढत राहणार असल्याचे देखील आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी पद पैसा आणि प्रतिष्ठा पेक्षा आम्ही माणसे मिळवण्याचे काम केले आहे.
शिवराज पाटील यांनी भाजप सरकार सत्तेच्या माध्यमातून लोकशाहीचा गळा घोटू पाहत आहे त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी आणि आमदार सतेज पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी आपण पक्ष प्रवेश करत असल्याचे सांगितलं. (Shivraj Patil joins Congress)
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास आंबोळे, माजी नगरसेवक मधुकर रामाने, मोरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य आशिष पाटील यांनी मनोगत व्यक्त करत थेट पाईपलाईनसाठी आमदारकी पणाला लावणाऱ्या आमदार सतेज पाटील यांना बळ ध्या असे आवाहन केलं. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक राहुल माने, इंद्रजीत बोंद्रे, राजू साबळे, नंदू पिसे, धीरज पाटील, दिलीप टिपुगडे, विश्वास गुरव, सुमन गुरव, भीमराव देसाई, केरबा जाधव, महादेव पाटील, राहुल माजगावकर, श्रीकांत पाटील, लखन चव्हाण, अभिजीत देठे, यशवंत शिंदे, साहिल देसाई, विजय गुजर, अलका सनगर, नीता पाटील, राजू फुटाणे, धनंजय बोंगाळे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येन उपस्थित होते.