Home » Blog » Greetings from Thackeray brothers to Balasaheb : तब्बल ११ वर्षानंतर ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी

Greetings from Thackeray brothers to Balasaheb : तब्बल ११ वर्षानंतर ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी

by प्रतिनिधी
0 comments
Greetings from Thackeray brothers to Balasaheb

मुंबई : बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त तब्बल ११ वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधू एकत्र आले. आज शिवाजी पार्कावरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दोघांनी अभिवादन केले. आजारी असूनही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही शिवतीर्थावर येऊन वंदन केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १३ व्या स्मृतीदिनी दादरमधील शिवतीर्थावर शिवसैनिक मोठया संख्येने येत आहेत. या स्मृतीस्थळावर ११ वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याचे पहायला मिळाले. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याचे पहायला मिळाल्यावर शिवसैनिक आणि मनसैनिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. (Greetings from Thackeray brothers to Balasaheb)

आज सोमवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास शिवतीर्थावर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि अदित्य ठाकरे आले. त्यांनी पुष्पहार अर्पण करुन बाळासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर १५ मिनिटांनी राज ठाकरे आले. त्यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर काही काळ ठाकरे बंधू एकत्र बसले होते. त्यांच्यासोबत चंदू मामा, अदित्य ठाकरे, रश्मी ठाकरेही होत्या. (Greetings from Thackeray brothers to Balasaheb)

गेल्या काही महिन्यात ठाकरे बंधू अनेकदा एकत्र आले आहेत. शिवाजी पार्क येथील मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमासही ठाकरे बंधू एकत्र आले होते. आज दोघां भावानी काही काळ एकत्र चर्चा केली. राज ठाकरे स्मृतीस्थळावरुन निघताच अदित्य ठाकरे त्यांना गाडीमध्य बसवण्यासाठी गेले होते.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00