मुंबई : विशेष प्रतिनिधी : भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात तीन पक्ष चालवतात. एक भाजपा, दुसरा एकनाथ शिंदेंचा पक्ष आणि तिसरा अजित पवारांचा पक्ष, अशी टीका करून शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यापुढे कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत, असे भाकीत केले.(Raut slaps Pawar-Shinde)
अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री योग जुळणार का, या प्रश्नावर खासदार राऊत यांनी हे दोघेही मुख्यमंत्री होणार नाही, असे सांगितले. त्याचवेळी अजित पवारांचा राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपात विलीन झाले, तर कदाचित भविष्यात ते भाजपाचे मुख्यमंत्री होतील. हे स्वतः अमित शाह यांनी त्यांना सांगितले आहे, असा मोठा दावाही राऊत यांनी केला.
ते म्हणाले, मी सातत्याने सांगत आलो आहे की, छगन भुजबळ शिवसेनेत असते तर मुख्यमंत्री झाले असते. नारायण राणे अजून काही काळ थांबले असते, तर पुन्हा शिवसेनेतूनच मुख्यमंत्री झाले असते. मनोहर जोशी झाले ना. ते पक्षासोबत राहिले. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. अजित पवार भाजपासोबत राहून मुख्यमंत्री होणार नाहीत, असे राऊत यांनी ठामपणे सांगितले. (Raut slaps Pawar-Shinde)
शिंदेंना भाजपमध्ये विलीन व्हावे लागेल
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने एकनाथ शिंदे यांनी पाहू नयेत. त्यांना पुन्हा या राज्याचा मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपामध्ये विलीन व्हावे लागेल. अमित शहा यांचा पक्ष्ज्ञ महाराष्ट्राचा शत्रू आहे. त्यांच्याकडून जर कोणी सत्कार घेत असतील, तर ती महाराष्ट्राशी बेईमानी आहे. ज्या अमित शहांनी महाराष्ट्र तोडण्यासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी संबंधित पक्ष तोडले. ते अमित शाह महाराष्ट्रातील नेत्यांचा सत्कार करणार का, अजिबात नाही. आम्ही शहा यांच्या कार्यक्रमाला जाणार नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले. (Raut slaps Pawar-Shinde)
एका कार्यक्रमात, महाराष्ट्राला अद्याप महिला मुख्यमंत्री मिळालेला नाही. महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे, असे मत प्रदर्शन करण्यात आले होते. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, आपल्याला सगळ्यांना तसे वाटत असते, पण शेवटी योग जुळून यावा लागतो. मलाही वाटते की, मी मुख्यमंत्री व्हावे. पण कुठे जमते. कधी ना कधी तो योगही जुळून येईल, नाही असे नाही, असे म्हटले होते. पवार यांच्या वक्तव्याची खासदार राऊत यांनी खिल्ली उडवली.
हेही वाचा :
निधीची पळवापळवी, शिरसाट संतापले!
गोगोईंची मुले भारतीय नागरिक नाहीत