युवा विश्वविजेता डी. गुकेश ‘या’ स्पर्धेत कार्लसनशी भिडणार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावून युवा विश्वविजेत बनण्याचा मान मिळवणाऱ्या डी. गुकेश आता कार्लसनशी भिडणार आहे. डी. गुकेश पुढील वर्षी नॉर्वे बुद्धीबळ स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनशी भिडणार आहे. ही स्पर्धा २६ मे ते ६ जून या कालावधीत खेळवली जाणार आहे. (D Gukesh)

१८ वर्षीय डी. गुकेशने यावर्षी टाटा स्टील मास्टर्स स्पर्धा जिंकली. यासह त्याने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. गेल्या आठवड्यात सिंगापूर येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. गुकेशने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘नॉर्वेमध्ये पुन्हा एकदा जगातील सर्वात बलाढ्य खेळाडूंपैकी एकाचा सामना करताना मला आनंद होत आहे. स्पर्धेत मजा येईल.’

गतवर्षी गुकेशने या स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून तो विश्वविजेता म्हणून कार्लसनला त्याच्याच देशात आव्हान देणार आहे. नॉर्वे बुद्धिबळाचे संस्थापक आणि स्पर्धेचे संचालक केजेल मेडलँड म्हणाले की, ‘हा सामना शानदार होईल. जागतिक बुद्धिबळ क्रमवारीच्या अव्वसस्थानी असलेल्या कार्लसन आणि युवा विश्वविजेता यांच्यातील सामना कसा होतो. याकडे विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे. (D Gukesh)

हेही वाचा :

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत