ichalakaranji crime : कांडी मशीनवर स्कार्फ अडकून महिलेचा मृत्यू

इचलकरंजी : प्रतिनिधी : येथील संग्राम चौक परिसरातील यंत्रमाग कारखान्यात कांडी मशिनमध्ये स्कार्फ अडकून झालेल्या अपघातात शालन मारुती पवार (वय ६३ रा. बाळनगर) या वृध्देचा मृत्यू झाला. घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. (ichalakaranji crime)

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, संग्राम चौक परिसरात इस्माईल खानापुरे यांचा यंत्रमाग कारखाना आहे. पोटमाळ्यावर कांडीमशिन आहे. याठिकाणी शालन पवार काम करीत होत्या. शालन यांनी बचावसाठी स्कार्फ बांधला होता.  त्यांचा हा स्कार्फ कांडी मशिनमध्ये अडकला आणि वेगाने फिरल्यामुळे स्कार्फचा गळफास लागून पवार यांचा जागीच मृत्यू झाला. काही वेळानंतर कारखान्यातील कामगार पोटमाळ्यावरील कांडी मशिनच्या ठिकाणी गेले असता ही घटना उघडकीस आली. पवार यांना उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रजनीकांत कांबळे करीत आहेत. (ichalakaranji crime)

हेही वाचा :

बनावट दस्त करून बँकेला सव्वा बारा कोटीला गंडा
कास, महाबळेश्‍वर, पाचगणीला ‘मे तेरी रानी, तू मेरा…’

 

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ