Windies : वेस्ट इंडिजचे निर्भेळ यश

बॅसेटेअर : वेस्ट इंडिजने बांगलादेशविरुद्धच्या वन-डे क्रिकेट मालिकेमध्ये सलग तिसरा विजय नोंदवून ३-० असे निर्भेळ यश मिळवले. आमीर जांगूने पदार्पणाच्या सामन्यात नाबाद शतक झळकावून वेस्ट इंडिजला ४ विकेटनी विजय मिळवून दिला. (Windies )

हा सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजसमोर ३२२ धावांचे आव्हान होते. हे आव्हान विंडीजने ४५.५ षटकांत ६ बाद ३२५ धावांसह पार केले. सुरुवातीच्या पाच षटकांमध्येच वेस्ट इंडिजने तीन विकेट्स गमावल्यामुळे त्यांची अवस्था ३ बाद ३१ अशी झाली होती. त्यानंतर, केसी कार्टी आणि शेर्फेन रुदरफोर्ड यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचून विंडीजचा डाव सावरला. रुदरफोर्ड ३० धावांवर बाद झाल्यानंतर कार्टी आणि जांगू यांनी पाचव्या विकेटसाठी १३२ धावा जोडल्या. कार्टीने ८८ चेंडूंमध्ये १० चौकार व २ षटकारांसह ९५ धावांची खेळी केली. त्याचे शतक मात्र अवघ्या पाच धावांनी हुकले.

कार्टी आणि पाठोपाठ रॉस्टन चेस बाद झाल्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ पुन्हा अडचणीत सापडला होता. तथापि, पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या जांगूने गुडाकेश मोतीसह नाबाद ९१ धावांची भागीदारी रचून वेस्ट इंडिजचा विजय साकारला. जांगूने अवघ्या ८३ चेंडूंमध्ये ६ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १०४ धावा फटकावल्या. वेस्ट इंडिजतर्फे पदार्पणात वन-डे शतक झळकावणारा तो डेझमंड हेन्सनंतरचा केवळ दुसरा फलंदाज ठरला. हेन्स यांनी १९७८ मध्ये वन-डे पदार्पणात शतक झळकावले होते. त्यानंतर, तब्बल ४६ वर्षांनी जांगूने ही कामगिरी केली. मोतीने ३१ चेंडूंमध्ये ३ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ४४ धावा करून जांगूला उपयुक्त साथ दिली. (Windies )

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ५ बाद ३२१ धावा केल्या. बांगलादेशकडून सौम्य सरकार (७३ धावा), कर्णधार मेहदी हसन मिराझ (७७ धावा), महमदुल्ला (नाबाद ८४ धावा) आणि जाकेर अली (नाबाद ६२ धावा) यांनी अर्धशतके झळकावली. एकतिसाव्या षटकात बांगलादेश ५ बाद १७१ धावांवर असताना विंडीजला सामन्यावर पकड मिळवण्याची संधी होती. तथापि, महमदुल्ला आणि जाकेर यांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद दीडशे धावा जोडून बांगलादेशला सव्वातीनशे धावांच्या आसपास पोहचवले. (Windies )

हेही वाचा :

मुंबई अंतिम फेरीत
बुद्धीबळाच्या पटावरचा नवीन ‘राजा’

रहाणेची बॅट तळपली

https://www.espncricinfo.com/series/west-indies-vs-bangladesh-2024-25-1433357/west-indies-vs-bangladesh-3rd-odi-1433382/full-scorecard

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!