Home » Blog » वारकरी संप्रदाय वारकऱ्यांचा, धारकऱ्यांचा नाही : विकास लवांडे

वारकरी संप्रदाय वारकऱ्यांचा, धारकऱ्यांचा नाही : विकास लवांडे

by प्रतिनिधी
0 comments
Warkari Sampradaya belongs to the Warkaris

जमीर काझी : मुंबई : संतांचा भागवत वारकरी संप्रदाय हा वारकऱ्यांचा आहे,धारकऱ्यांचा नाही. संतांच्या भागवत वारकरी संप्रदायामध्ये सर्वांना समान अधिकार आहेत. हा संप्रदाय हिंदू- मुस्लिम असा राजकीय हेतूने धार्मिक वादविवाद करण्यासाठी नाही. धर्माच्या नावाने परधर्माचा द्वेष करणारे धर्मद्रोही व ढोंगी लोक आहेत. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी लगावला.

वारकरी संप्रदायात घुसलेल्या अपप्रवृत्ती  व २० प्रतिगामी व्यक्तीविरुद्ध लवांडे  यांनी  मोहीम सुरू करून त्यांचा अजेंडा उघड करत आहेत. त्यानुषगाने मुंबईत पत्रकारांशी बोलताना धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवीत असलेल्याविरुद्ध कडाडून  हल्ला चढविला.

विलास लवांडे  म्हणाले, संतांच्या भागवत वारकरी संप्रदायाला कुणीही शंकराचार्य किंवा कोणतेच आचार्य नाहीत. संतांच्या भागवत वारकरी संप्रदायामध्ये फक्त हरिभक्ती परायण असतात. नीती विरु‌द्ध अनिती, न्याय विरुद्ध अन्याय, सत्य विरुद्ध असत्य असा संघर्ष अनाधिकालापासून आजही सुरु आहे. त्या नीती धर्माचे आणि सत्य धर्माचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. धर्म ही आचरण करण्याची गोष्ट आहे. संघटन किंवा परधर्माचा द्वेष करण्यासाठी कोणताही धर्म शिकवत नाही. कोणत्याही धर्माच्या नावाने समाजात दुही पसरवित असल्यास तो धर्मविरोधी आहे. (Warkari Sampradaya belongs to the Warkaris)

विलास लवांडे म्हणाले, ज्यांना स्वतःचा धर्म नीट समजलेला नाही, धर्माप्रमाणे आचरण नाही, त्यांनी दुसऱ्या धर्माचे विश्लेषण करू नये. कोणतेही कर्मकांड, पूजा, विधी करणे म्हणजे धर्म पालन नव्हे. मानवतावादी असलेल्या सर्व संतांनी सगुनाकडून निर्गुणाकडे जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे.संतांच्या भागवत वारकरी संप्रदायामध्ये कोणतेही कर्मकांड योग याग विधी किंवा पुरोहित शाही, जाती वर्ण वर्चस्ववाद, उच नीच असा भेदाभेद मान्य नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांचे ‘पसायदान’ हा ज्ञानेश्वरीचा सारांश आहे. त्या वैश्विक विचारांचा अर्थ प्रत्येकाने नीट समजून घेऊन त्या पद्धतीने आचरण करण्यासाठी आहे. केवळ पाठांतर नसावे.प्रचलित हिंदू मुस्लिम आणि सनातन धर्मियांना आपापल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचे स्वातंत्र्य भारताच्या संविधानाने दिलेले आहे. मात्र त्यासाठी भागवत वारकरी संप्रदायात घुसून संत ज्ञानोबा तुकोबांच्या अर्थात नारदाच्या गादीचा कुणीही वापर करू नये हीच आमची स्पष्ट भूमिका आहे. (Warkari Sampradaya belongs to the Warkaris)

सनातन वैदिक धर्म आणि भागवत वारकरी संप्रदाय यांचे अधिष्ठान ग्रंथ, आराधना पद्धती, आराध्य दैवत, तीर्थक्षेत्र आणि परंपरा पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत, त्याची कुणीही मिसळ करू नये. तसे केल्यास त्याला घुसखोरी शिवाय दुसरा शब्द नाही. ‘याता याती धर्म नाही विष्णूदासा,भगवद्‌गीता आणि सर्व संत साहित्यामध्ये जो धर्म शब्द आलेला आहे जो रामायण महाभारतात सुद्धा आहे तो धर्म म्हणजे नीती धर्म आणि सत्य धर्म आहे. भागवत वारकरी संप्रदायातील धर्मांधता, मनुवादी आणि द्वेषमूलक विचार आणि धंदेवाईकपणाला आमचा ठाम विरोध आहे व पुढेही राहील.असे विकास लवांडे यांनी सांगितले.

ज्ञानोबा तुकोबा पेक्षा मनू श्रेष्ठ होता असे जाहीर विधान करणाऱ्या संभाजी भिडेंचा तुम्ही निषेध केला होता का ?  संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचे ग्रंथ हे परिपूर्ण ग्रंथ नाहीत असे जाहीर वक्तव्य करणाऱ्या गोविंद देवगिरीचा निषेध केला होता का? आदी प्रश्नची सरबत्ती केली. (Warkari Sampradaya belongs to the Warkaris)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00