Home » Blog » ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ माजी राज्यपाल  डॉ. डी.वाय.पाटील यांचे निधन

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ माजी राज्यपाल  डॉ. डी.वाय.पाटील यांचे निधन

by प्रतिनिधी
0 comments
Dr. D. Y. Patil passes away

कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, बिहारचे माजी राज्यपाल, पदमश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. डी.वाय.पाटील यांचे आज मंगळवार ४ ऑगस्ट रोजी वयाच्या ९० वर्षी निधन झाले. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय डी.पाटील, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचे ते वडील होत. (Dr. D. Y. Patil passes away. D. Y. Patil, Kolhapur, Padma Shri).

डी.वाय.पाटील यांच्या पार्थिव अंत्यदर्शनासाठी बुधवारी ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत कोल्हापूरातील कसबा बावडा येथील यशवंत निवास येथे ठेवण्यात येणार आहे. अंत्ययात्रा दुपारी वाजता निघणार आहे.  सायंकाळी पाच वाजता डी. वाय.पाटील मेडिकल कॉलेज , लाईन बाजार ,कसबा बावडा येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

गेले काही दिवस डॉ. डी.वाय.पाटील वृध्दापकाळाने आजारी होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. २२ ऑक्टोबर १९३५ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उदंड काम केले असून कोल्हापूर, पुणे, मुंबईसह देशभर उच्च शिक्षण देणाऱ्या इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. त्यांनी स्थापन केलेल्या महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी आज देशसेवेत कार्यरत आहेत. देशभरात १८२ हून अधिक शैक्षणिक संस्था आणि सात विद्यापीठांची स्थापना केली आहे. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाबद्दल भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना पद्मश्री देऊन गौरव केला होता. ते बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून काम केले आहे. (Dr. D. Y. Patil passes away. D. Y. Patil, Kolhapur, Padma Shri)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!