Home » Blog » गोकुळ संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

गोकुळ संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

by प्रतिनिधी
0 comments
Court Refuses to Grant Extension to Gokul's Board of Directors

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने नकार दिला आहे. त्यामुळे गोकुळवर प्रशासक राज अटळ आहे. चार मे पासून गोकुळ दूध संघावर प्रशासक राज सुरू होणार आहे.

गोकुळच्या सभासद संस्था आणि अवसायानामधील संस्थांची सुनावणी सर्किट बेंचमध्ये सुरू आहेत. या संस्थाच्या सुनावणीमुळे गोकुळची निवडणूक पुढे जाणार आहे. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला एक वर्षाची मुदतवाढ देण्याची गोकुळकडून न्यायालयाला विनंती केली होती. पण कोल्हापूर सर्किट बेंचने गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे संचालकांना झटका बसला आहे. दरम्यान गोकुळ दूध संघाने न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप याचिकेकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी केला. (Court Refuses to Grant Extension to Gokul’s Board of Directors)

गोकुळवर सध्या महायुतीची सत्ता असून राष्ट्रवादीचे नाविद मुश्रीफ गोकुळचे अध्यक्ष आहेत. तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आहेत. विदयमान गोकुळच्या संचालक मंडळात भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी, जनसुराज्यच्या संचालक मंडळाची संख्या जादा आहे. तसेच विरोधी सतेज पाटील गटाचे संचालक अल्पमतात आहेत. महायुतीची सत्ता गोकुळवर असल्याने संस्थेवर प्रशासक आणू नये यासाठी मुख्यमंत्री दरबारी आणि न्यायालयात प्रयत्न करण्यात आले. न्यायालयाने संचालक मंडळास मुदतवाढ देण्यास ठाम नकार दिला आहे. तर गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत, असे गोकुळ अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पण चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी थेट मंत्री मुश्रीफ आणि राष्ट्रवादीवर टीका केली असल्याने महायुतीत मतभेद जगजाहीर झाले आहेत. (Court Refuses to Grant Extension to Gokul’s Board of Directors)

यापूर्वी गोकुळवर महादेवराव महाडिक, पी.एन.पाटील गटाची सत्ता होती. ही सत्ता पाच वर्षापूर्वी मुश्रीफ, सतेज पाटील, विनय कोरे, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर यांनी खेचून आणली होती. प्रशासक राजवट प्रश्नांवर संचालक मंडळाची एकजूट असली तरी महाडिक गट अलिप्त राहणार असल्याने गोकुळच्या आगामी निवडणूक मोठे उलटफेर होण्याची शक्यता आहे. (Court Refuses to Grant Extension to Gokul’s Board of Directors)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00