जागतिक कसोटी क्रमवारीत विराटची ‘घसरगुंडी’

वृत्तसंस्था : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघाला पाठोपाठ धक्के बसत आहेत. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीची घसरगुंडी झाली आहे, तर निराशाजनक कामगिरीमुळे कर्णधार रोहितचेही नुकसान झाले आहे. ऋषभ पंतची थोडी सुधारणा झाली आहे. नव्या क्रमवारीत विराट कोहली टॉप २० फलंदाजांच्या यादीतून १० वर्षांच्या कालावधीनंतर बाहेर गेला आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत ९०३ रेटिंगसह इंग्लंडचा जो रूट अजूनही पहिल्या स्थानावर आहे,  तर न्यूझीलंडचा  केन विल्यमसन ८०४ रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. नव्या क्रमवारीत इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता ७७९ रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

विराटची घसरगुंडी

विराट कोहलीची आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत ८ स्थानांनी घसरण झाली आहे, तर रोहित शर्मा क्रमवारीत ६२९ रेटिंगसह २६ व्या क्रमांकावर आहे. विराटने यावर्षी एकूण ६ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने २२.७२ च्या सरासरीने केवळ २५० धावा केल्या आहेत. यात त्याने केवळ १ अर्धशतक झळकवले आहे.

पंतची क्रमवारीत सुधारणा

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत यशस्वी जैस्वाल मुंबई कसोटीत विशेष कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्याची ताज्या क्रमवारीत एका स्थानाने घसरण झाली आहे. त्यामुळे क्रमवारीत ७७७ रेटिंगसह चौथ्या स्थानावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ ७५७ रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे. मालिकेतील अखेरच्या सामन्यात रिषभ पंतने इतर फलंदाजांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली. यामुळे त्याला क्रमवारीत फायदा झाला आहे. क्रमवारीत ७५० रेटिंगसह तो सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

Related posts

Indian women’s win : भारताचा मोठा विजय

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!