लैंगिक समतेसाठी लढणाऱ्या कणखर नेत्या

नवी दिल्ली : चिलीच्या माजी राष्ट्रपती वेरोनिका मिशेल बॅचेले जेरिया यांना यंदाचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. निःशस्त्रीकरण, विकास, लैंगिक समानता आणि वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टने म्हटले आहे. ट्रस्टचे अध्यक्ष माजी माजी परराष्ट्र सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने हा पुरस्कार जाहीर केला. (Indira Gandhi Peace Prize 2024)

‘मिशेल यांनी जगभरातील महिला आणि पुरुषांसाठी अनुकरणीय आणि प्रेरणादायी काम केले आहे. शांतता, लैंगिक समानता, मानवी हक्क, लोकशाहीची प्रतिष्ठापना आणि विकासासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्या सातत्याने प्रयत्नरत आहेत. चिली-भारत संबंध वृद्धिंगत करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे,’ असे ट्रस्टने म्हटले आहे.

चिलीच्या ऑगस्टो पिनोशे या लष्करी हुकूमशाहीच्या काळात बॅचेले यांना तुरुंगवासाचा सामना करावा लागला. सुटकेनंतर त्यांची हद्दपारी झाली. पण पुन्हा त्या चिलीला परतल्या. २००६ ते २०१० आणि पुन्हा २०१४ ते २०१८ त्या देशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत शिक्षण आणि कर सुधारणा लागू केल्या. त्यांच्याच कार्यकाळात भारत आणि चिली यांच्यात मुक्त व्यापार करार झाला होता.
बॅशेले यांनी संयुक्त राष्ट्रात मानवाधिकारांसाठी उच्चायुक्त म्हणून काम केले. (Indira Gandhi Peace Prize 2024)

बॅशेले जागतिक स्तरावर समतेसाठी सातत्याने आवाज उठवत आहेत. महिला आणि ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाला अधिकार मिळावेत, यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. व्याप्त पॅलेस्टाईन आणि जगभरातील इतर विविध प्रदेशांत सुरू असलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरोधात त्या सातत्याने लढा देत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरोगामी धोरणांचा आग्रह, शांतता आणि मानवी मूल्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी त्या निडर भूमिका घेऊन कोणत्याही टीकेला भीक न घालता आजही कार्यरत आहेत.

विद्यार्थिदशेपासूनच राजकारणात

बॅचेले यांचा विद्यापीठीय शिक्षण घेत असतानाच राजकारणाकडे ओढा होता. विद्यापीठाच्या पहिल्या वर्षातच त्या ‘सोशलिस्ट युथ’मध्ये सामील झाल्या. ‘पॉप्युलर युनिटी’च्या त्या सक्रिय समर्थक होत्या. चिलीतील सत्तापालटानंतर लगेचच त्या आणि त्यांच्या आईंनी सोशलिस्ट पार्टीसाठी भूमिगत काम सुरू ठेवले. ही सरकारविरोधात चळवळ होती. मात्र सरकारी यंत्रणांनी त्या सर्वांना पकडले. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात, बॅशेले, निर्वासनातून परतल्या आणि राजकीय पटलावर पुन्हा सक्रिय झाल्या. त्या आघाडीवर दिसत नसल्या तरी चिलीमध्ये लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी लढत होत्या. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.

हेही वाचा :

शेतकऱ्यांचे दिल्लीतील आंदोलन स्थगित
गांधी भारताचा आत्मा, तर आंबेडकर मेंदू
३१ वर्षे तुरुंगवास आणि १५४ फटक्यांची शिक्षा, कोण आहेत नरगिस मोहम्मदी?

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले