कोल्हापूरच्या ‘वारसा’ला राष्ट्रीय पुरस्कार

सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कोल्हापूरच्या सचिन सूर्यवंशी यांनी तयार केलेल्या कोल्हापूरच्या मर्दानी खेळावरील ' वारसा ' या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट कला/सांस्कृतिक चित्रपट विभागात राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.

कोल्हापूर: सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कोल्हापूरच्या सचिन सूर्यवंशी यांनी तयार केलेल्या कोल्हापूरच्या मर्दानी खेळावरील ‘ वारसा ‘ या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट कला/सांस्कृतिक चित्रपट विभागात राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. ऑक्टोबर २०२४ मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राजधानी दिल्लीत पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे.

 

कोल्हापुरातील अनेक कलावंतांनी शिवकालीन युद्ध कला असलेल्या मर्दानी खेळाची निष्ठेने जोपासना केली आहे. मर्दानी खेळाचे आखाडे अजूनही तग धरून आहेत. मर्दानी खेळ खेळणारे खेळाडू आणि वस्ताद मंडळींनी पदराला खार लावून या खेळाची जपणूक केली आहे. युद्धकलेचा वारसा जपणा-या या कलेच्या कलात्मक सादरीकरणाबरोबरच ती जपण्यासाठी कोल्हापुरातील स्थानिक कसा प्रयत्न करत आहेत हे `वारसा` या माहितीपटात दाखवण्यात आले आहे.

सचिन सूर्यवंशी यांना २०१९साली ‘द सॉकर सिटी’ या माहितीपटाला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. २०२२ मध्ये ‘वारसा’ साठी त्यांना दुसऱ्यांदा फिल्मफेअर मिळाला. आणि आता यांच्या या माहितीपटाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे. ‘वारसा’ हा माहितीपट युट्यूबवर उपलब्ध आहे.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी