Home » Blog » Vaibhav Suryavanshi : वैभवची विक्रमांना गवसणी

Vaibhav Suryavanshi : वैभवची विक्रमांना गवसणी

सर्वांत कमी वयाचा, सर्वांत वेगवान भारतीय शतकवीर

by प्रतिनिधी
0 comments
Vaibhav Suryavanshi

जयपूर : अवघ्या चौदा वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने झळकावलेल्या झंझावाती शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा ८ विकेटनी पराभव केला. वेभवने ३८ चेंडूंमध्ये ७ चौकार व ११ षटकारांसह १०१ धावा फटकावताना काही विक्रमांनाही गवसणी घातली. त्याच्या व राजस्थानच्या काही विक्रमांवर टाकलेली ही नजर. (Vaibhav Suryavanshi)

  • १४ वर्षे ३२ दिवस : वैभव सूर्यवंशीने १४ वर्षे ३२ दिवस इतके वय असताना टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावले. याबरोबरच टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो भारताचा सर्वांत कमी वयाचा खेळाडू ठरला. हा विक्रम याअगोदर विजय झोलच्या नावावर होता. त्याने २०१३ मध्ये महाराष्ट्राकडून खेळताना मुंबईविरुद्ध १०९ धावांची खेळी केली होती. त्यावेळी त्याचे वय १४ वर्षे ३२ दिवस इतके होते.
  • ३५ : वैभव सूर्यवंशीने ३५ चेंडूंमध्ये झळकावलेले शतक हे आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान शतक ठरले. आयपीएलमध्ये सर्वांत वेगवान शतकाचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर असून त्याने बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्सतर्फे ३० चेंडूंत शतक झळकावले होते. त्याचबरोबर वैभव हा आयपीएलमधील सर्वांत वेगवान भारतीय शतकवीर ठरला. त्याने ३७ चेंडूंमध्ये शतक झळकावणाऱ्या युसूफ पठाणला मागे टाकले. पठाणने २०१० च्या मोसमात राजस्थान रॉयल्सतर्फे खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध ३७ चेंडूंमध्ये शतक ठोकले होते.(Vaibhav Suryavanshi)
  • १ : जागतिक स्तरावर वयाची पंधरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वी टी-२० क्रिकेटमध्ये ५० धावांचा टप्पा ओलांडणारा वैभव हा पहिलाच फलंदाज आहे. यापूर्वी, अफगाणिस्तानच्या हसन एसाखिलने १५ वर्षे ३६० दिवस इतके वय असताना २०२२ साली अर्धशतक झळकावले होते.
  • ११ : वैभवने आपल्या खेळीदरम्यान ११ षटकार खेचले. त्याने आयपीएल खेळीदरम्यान सर्वाधिक षटकारांच्या मुरली विजयच्या विक्रमाशी बरोबरी केली. विजयने २०१० मध्ये चेन्नई सुपरकिंग्जतर्फे राजस्थान रॉयल्सविरुद्ध १२७ धावांची खेळी करताना ११ षटकार मारले होते.
  • १६६ : वैभव आणि यशस्वी जैस्वाल यांनी केलेली १६६ धावांची भागीदारी ही राजस्थान रॉयल्सची आजवरची कोणत्याही विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी आहे. यापूर्वी, २०२२च्या मोसमात जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल यांनी राजस्थानकडून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १५५ धावांची भागीदारी रचली होती.(Vaibhav Suryavanshi)
  • २१० : राजस्थानने गुजरात टायटन्सचे २१० धावांचे विजयी लक्ष्य १५.५ षटकांत पूर्ण केले. याबरोबरच, टी-२० क्रिकेटमध्ये १६ षटकांच्या आत २०० पेक्षा अधिक धावांचे आव्हान पूर्ण करणारा राजस्थान हा पहिलाच संघ ठरला.

हेही वाचा :
बुमराह म्हणतो, मलिंगाच सरस!
कर्णधारपदासाठी श्रेयसलाच पसंती

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00