कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळ दूध संघात महायुतीची सत्ता स्थापनेसाठी भाजप महायुती सरकारने बॅक डोअर एंट्रीचा डाव खेळून आमदार सतेज पाटील यांना सत्तेपासून रोखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत गोकुळमध्ये शासननियुक्त पाच संचालकांची नियुक्ती केली असून त्यापैकी चार जणांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीला बहुमत मिळाले असतानाही महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने रडीचा डाव खेळल्याची भावना दूध उत्पादकांकडून व्यक्त केली जात आहे. (Five government-appointed directors inducted into Gokul.)
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला १३ जागा मिळून बहुमत मिळाले. तर विरोधी महायुतीला १२ जागा मिळाल्या. अध्यक्षपद निवडीच्या बैठकीत १४ संचालकांच्या उपस्थितीचा कोरम असल्याने महायुतीचे १२ संचालक गैरहजर राहिल्याने निवडणूक अधिकारी मौसमी चौगुले यांनी सभा तहकूब केली. समविचारी आघाडीच्या संचालकांनी समांतर सभा घेऊन शशिकांत पाटील यांची अध्यक्षपदी निवड केली. (Five government-appointed directors inducted into Gokul.)
महायुतीच्या १२ संचालकांनी बहिष्कार घातल्याने समविचारी आघाडीने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केले. सत्ताधारी आणि विरोधी आघाडीचे म्हणणे ऐकून न्यायालयाने १० नोव्हेंबर रोजी अध्यक्ष निवडीची सभा बोलावण्याचे आदेश दिले. तसेच २५ संचालकांना अध्यक्ष निवडीच्या सभेला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर राज्य सरकारने गोकुळचा ताबा महायुतीकडे यावा यासाठी प्रयत्न सुरू केले.
आज बुधवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत सहकार कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर ठेवला. गोकुळ सारख्या शिखर संस्थावर सरकारच्या माध्यमातून चार तज्ज्ञ संचालक आणि एक उपनिंबधक दर्जाचा अधिकार थेट संचालक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शासन नियुक्त चार संचालकांचा मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. पण शासननियुक्त चार संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला असून त्यांना अध्यक्षपदाचा निवडणूक लढवता येणार नाही. मात्र हा निर्णय जिल्हा बँकांना लागू होणार नाही. (Five government-appointed directors inducted into Gokul.)