कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे आणि ज्येष्ठ दिग्दर्शक , रंगकर्मी डॉ.शरद भूथाडिया यांना ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते आणि ब्रँड कोल्हापूरचे संकल्पक आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील तीस मान्यवरांना ब्रँड कोल्हापूर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ब्रँड कोल्हापूर पुरस्कार उपक्रमाचे हे सातवे वर्ष आहे. (Vasantrao More, Sharad Bhuthadia, Brand Kolhapur Award)
प्रमुख पाहुणे पानिपतकार विश्वास पाटील यांनी कोल्हापूरच्या मातीमध्ये वेगळी ऊर्जा असल्याचे नमूद केले. कोल्हापूर शहराशी आपले अनोखे नाते त्यांनी अनेक संदर्भ त्यांनी दिले. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी ब्रँड कोल्हापूर पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आपल्या कामगिरीने कोल्हापूर जिल्ह्याचा नावलौकिक केल्याचे सांगितले. (Vasantrao More, Sharad Bhuthadia, Brand Kolhapur Award)
सोनम मस्कर, अमृता पुजारी ब्रँड कोल्हापूर पुरस्काराने सन्मानित
आंतरराष्ट्रीय नेमबाज सोमम मस्कर, लॉन टेनिस खेळाडू संदेश कुरळे यांचा होस्ट बँड पुरस्काराने गौरव करण्यात आला. ब्रँड कोल्हापूर पुस्कार, आयएएस रोहित मालवेकर, हर्षवर्धन पाटील, वैभवी चव्हाण, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेसाठी निवड झालेली जुही धारवडे, आयर्नमॅन डॉ. नंदिता पराजंपे जोशी, ऑस्ट्रेलिया कबड्डी संघाचे फिजिओथेरपिस्ट डॉ. ऋषिकेश पोळ, दक्षिण अफ्रिका संघाचे फिजिओथेरपिस्ट डॉ. महेश शिंदे, सिंगापूर नमस्ते भारत ब्युटी क्विन पूजा पावसकर, शिल्पकार शुभम सुतार, योगखेळाडू रोहित चव्हाण, आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाडू अमृता पुजारी, आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू सानिका माने, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विश्वजीत मोरे, आंतरराष्ट्रीय नेमबाज शांभवी क्षीरसागर, आंतरराष्ट्रीय तलवारबाजी खेळाडू जिजाऊ पाटील, मोनिका एकल, यंग स्कॉलर स्वप्नाली मगदूम, लेफ्टनंट सई जाधव, आंतरराष्ट्रीय शेफ जितेंद्र करंबे, राष्ट्रीय मैदानी खेळ खेळाडू वेदांती मनगुतकर, बुद्धिबळपटू हृषिकेश कबनुरकर, आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाडू ऋतुजा गुरव, युपीएस परीक्षा उत्तीण ऋषिकेश आलासे, प्रथमेश शिंदे, पांडुरंग फोंडे, टेनिसपटू मधुरिमा सावंत, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू गौरव पाटील, अदित्य जाधव, तन्वी मगदूम, पॅरा स्विमर देवेन पवार यांचाही ब्रँड कोल्हापूर पुरस्काराने गौरव करण्यात आला. (Vasantrao More, Sharad Bhuthadia, Brand Kolhapur Award)