Home » Blog » CM announces aid : पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांसाठी ५० लाख

CM announces aid : पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांसाठी ५० लाख

मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली मदतीची घोषणा

by प्रतिनिधी
0 comments
CM announces aid)

मुंबई : विशेष प्रतिनिधी : जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे पर्यटकांवर भयंकर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २७ पर्यटकांसह एक स्थानिक तरूण मृत्युमुखी पडला होता. या हल्ल्याचा सर्वत्र तीव्र निषेध होत आहे. देशभरातील जनतेत संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या. केंद्र सरकारने तातडीने पावले उचलत पाकिस्तानविरोधात कठोर निर्णय घेतले.(CM announces aid)

भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांच्या हकालपट्टीबरोबरच भारत-पाकिस्तानदरम्यानचा सिंधु पाणी करार स्थगित केला. महाराष्ट्र सरकारनेही केंद्र सरकारच्या निर्णयाला प्रतिसाद देत महाराष्ट्रात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची यादी तत्काळ तयार केली.

आता आणखी एक महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (२९ एप्रिल) जाहीर केला. पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या राज्यातील पर्यटकांच्या कुटुंबातील वारसांना ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. तत्पूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाकडे, रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेळी स्पष्ट केले. (CM announces aid)

 मृतांपैकी ज्यांच्या कुटुंबात रोजगाराचा प्रश्न आहे, त्यांच्या थेट वारसांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री  फडणवीस यांनी आपल्या विशेषाधिकारात जाहीर केला. हल्ल्यातील मृतांपैकी जगदाळे यांच्या कुटुंबातील मुलीला नोकरी देण्याचा निर्णय कालच (सोमवारी) मुख्यमंत्री  फडणवीस यांनी जाहीर केला होता. (CM announces aid)

 मंत्रालयात झालेल्या बैठकीत सुरुवातीलाच पहेलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी काश्मीरमध्ये गेलेल्या सर्व पर्यटकांना सुखरूपपणे मायभूमीत परत आणल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पहेलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये पुणे, पनवेल, डोबविली येथील एकूण ६ पर्यटकाचा समावेश आहे. एकूण ८०० वर पर्यटक फिरण्यासाठी त्याठिकाणी गेले होते. त्या सर्वांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने विशेष विमानाची सोय केली  होती. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्य व केंद्र सरकारने आत्तापर्यंत याबाबत केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. त्यानंतर मृत पर्यटकांच्या कुटुंबीयांना व वारसदारांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केला.

हेही वाचा :
 संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी
काँग्रेसची पोस्ट ‘गायब…!’

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00