Home » Blog » Money for Kumbh Mela not for farmers : सरकारकडे कुंभमेळ्यासाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांसाठी नाही : वडेट्टीवार 

Money for Kumbh Mela not for farmers : सरकारकडे कुंभमेळ्यासाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांसाठी नाही : वडेट्टीवार 

by प्रतिनिधी
0 comments
Money for Kumbh Mela, not for farmers

जमीर काझी :  मुंबई : कुंभमेळाव्यासाठी शेकडो कोटी देत सरकार संकटात सापडलेल्या हजारो शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडण्याचं काम करत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत पण कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी खर्च करत आहेत, अशी टीका, विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते  आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली.

सत्ताधारी मतदारांना धमकावतेत

राज्यातील नगरपालिका व नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा ज्वर शिगेला पोहचला असताना सत्ताधारी नेते मतदारांना धमकावत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी हल्लाबोल केला  “कोणी तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे असल्याचे सांगतोय. तर कुणी अप्रत्यक्षपणे मतदारांना धमकावत आहेत. राज्याची तिजोरी यांच्या बापाची मिळकत आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (Money for Kumbh Mela, not for farmers)

महसुलमंत्र्यांच्या आजुबाजूला महसूल बुडवणारे

 निवडणूक प्रचारातील आरोप प्रत्यारोपाबाबत सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या कलगीतुर्‍याबाबत नागपुरात पत्रकारांशी बोलताना कडाडून टीका केली. जनतेच्या हिताचा विचार केला पाहिजे. परंतु मतासाठी सर्रासपणे धमकावत आहेत. जनतेला गृहीत धरत आहेत. पारदर्शी, स्वच्छ वातावरणात निवडणुका पार पडल्या पाहिजे,” असे सांगून ते म्हणाले, “महसूलमंत्र्याच्या आजूबाजूला असणारे महसूल बुडवणारे आहेत. हे अगदीच खरं आहे. वेळ पडल्यास आम्ही नावंही जाहीर करू. महसूलमंत्र्यांनी अशा लोकांना सोबत ठेवू नये. महायुतीत अंतर्गत वाद सुरू आहेत. तिघांची तोंडं तीन दिशेकडे असून जनतेच्या हिताचं यांना काहीही देणं-घेणं नाही. राजकारण गढूळ करण्याचं काम सुरू आहे. राज्यात एकमेकांची जिरवली जात आहे. (Money for Kumbh Mela, not for farmers)

सरकारमध्ये सगळे चोर भरलेत

कुंभमेळाव्यासाठी शेकडो कोटी देत सरकार संकटात सापडलेल्या हजारो शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडण्याचं काम करत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत पण कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी खर्च करत आहेत. तपोवनमधली झाडं कापली जात आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास केला जातो. कुंभमेळा महत्त्वाचा आहे पण राज्यातील शेतकरी हा महत्त्वाचा नाही का? ,” असा सवाल करूम वडेट्टीवार म्हणाले, “सरकारमध्ये सगळे चोर भरलेले आहेत. घोटाळे करणार एकमेकाला पाठीशी घालणार. चौकशीच्या नावावर प्रकरण लांबवत बसणार. प्रकरण विस्मरणात गेलं की पुन्हा जमीन बळकावत राहण्याची यांची पद्धती आहे. (Money for Kumbh Mela, not for farmers)

मनसेबाबत निर्णय स्थानिक नेते घेतील

 “काँग्रेसनं मुंबईत मनसेसोबत जायचं की नाही याबाबत स्थानिक नेते निर्णय घेतील. तुम्हाला सत्ता हवी की नको निवडणुकीत कोणासोबत जायचं हे त्यांनी ठरवावे. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. मनसेची भूमिका काहीपण असो, मनसेच्या भूमिकेवर काँग्रेसची काय भूमिका हे महत्त्वाचे आहे. या संदर्भात प्रदेशाध्यक्षांनी तो अधिकार स्थानिक नेत्यांना दिला आहे. असे  म्हणत मनसेसोबत मुंबईत मतदार याद्यांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने वेळ मागितल्याबद्दल वडेट्टीवार म्हणाले, “लाचार निवडणूक आयोगाकडून काय अपेक्षा ठेवणार? निवडणूक आयोगाची भूमिका ही सत्ताधारी लोकांना पूरक असल्याने आज देशातील लोकशाहीला घरघर लागली आहे.”

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00