कोल्हापूर : प्रतिनिधी : साखर कारखानदारांनी उसाला पहिली उचल प्रतिटन ४५०० रुपये द्यावी या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी किणी टोल नाक्यावर पुणे बेंगळुरू महामार्ग रोखला. ऐन दिवाळी सणाच्या अगोदर महामार्ग रोखल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. वाहनधारकांकडून पर्यायी मार्गाचा वापर केला जात आहे. (Farmers block Pune-Bengaluru highway, demanding better sugarcane prices)
हातकणंगले तालुक्यातील किणी गावात हनुमान मंदिरात दर्शन घेऊन राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी किणी टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलनास सुरूवात झाली. या प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी किणी टोल नाक्यावर ठाण मांडले आहे. अनेक शेतकरी रस्त्यांवर झोपले आहेत. उसाला पहिली उचल प्रतिटन ४५०० रुपये द्यावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. मागणी मान्य होईपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरूच राहील असा निर्धारही त्यांनी केला. (Farmers block Pune-Bengaluru highway, demanding better sugarcane prices)
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार प्रतिटन ३६०० ते ३८०० रुपये देण्याची भाषा करत आहेत. सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनीही प्रतिटन ३६०० रुपये देण्याची तयारी दाखवली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्याची प्रतिटन एफआरपी ३४५० ते ३६५० रुपये बसते. पण बाजारात साखरेला चांगला भाव मिळत असल्याने कारखान्यांनी दर देताना हात आखडता घेऊ नये. खते, बियाणे, किटकनाशकांचा दर वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ झाल्याने प्रतिटन ४५०० रुपये दर द्यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. (Farmers block Pune-Bengaluru highway, demanding better sugarcane prices)