USAID : भारतातील सर्व प्रकल्प स्थगित ठेवा

USAID

USAID

वॉशिंग्टन : यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (यूएसएआयडी) एका निर्देशानुसार भारतात त्यांच्या मदतीने सुरू असलेले सर्व प्रकल्प स्थगित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे यूएसएआयडीच्या सहकार्याने देशात सुरू असलेल्या प्रकल्पांवर गंभीर परिणाम होणार आहेत. विशेषत: आरोग्यविषयक उपक्रमांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांशी संबंधित यंत्रणांची चिंता वाढली आहे. (USAID)

युएसएआयडी निधीच्या माध्यमांतून तळागाळातील लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचण्यासाठी तांत्रिक सहाय्य वाढवले ​​आहे. शिक्षण, लिंग आणि हवामान बदल अशा प्रकल्पांचाही त्यात समावेश आहे. यूएसएआयडीच्या माध्यमातून  भारतात काहीच प्रमाणात प्रकल्प सुरू आहेत. आता पुन्हा स्थगितीचे आदेश आल्यामुळे हे प्रकल्प आणि त्याशी संलग्न असणाऱ्या प्रकल्पांवर विपरीत परिणाम संभवतो. जागतिक मदत लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. त्यामुळे विकासात योगदान देणाऱ्या स्वयंसेवी संस्था आधीच अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणींमध्ये वाढ होऊ शकते. (USAID)

‘यूएसएआयडी’च्या माध्यमातून देणाऱ्या येणाऱ्या सध्याच्या अनुदानाचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे. तीन महिन्याचा हा कालावधी आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्था आणि सरकारांसाठी प्रकल्पांचे संचालन करणाऱ्या एजन्सीसह भागीदारांनी त्यांनी स्थगिती कालावधी दरम्यानचा खर्च कमी करावा. ‘यूएसएआयडी’ कडून लेखी सूचना प्राप्त होईपर्यंत प्राप्तकर्त्याने या कराराअंतर्गत पुन्हा काम सुरू करू नये,” असे निर्देशात म्हटले आहे. दरम्यानच्या काळात अनुदानाचे पुनरावलोकन करण्यात येईल. (USAID)

‘प्रकल्पांचे काम स्थगित ठेवण्याचे निर्देश असले तरी अनिश्चितता वाटते. त्यामुळे भीती निर्माण होत आहे,” असे एका विकास व्यावसायिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. त्यांच्या संस्थेला इतर देणगीदार असल्याने काम सुरू ठेवण्यास ती सक्षम आहे.

‘यूएसएआयडी’ वेबसाइटनुसार, माता आणि बाल आरोग्य सेवा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करून सहा राज्यांमध्ये माता आणि बाल आरोग्य उपक्रमांना समर्थन देण्यात येत होते. अनेक शहरांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छता आणि स्वच्छताविषयक प्रकल्प राबवून आरोग्य सुधारण्यासाठी पुढाकार घेत होती. या व्यतिरिक्त, लिंग-आधारित हिंसाचार रोखण्यासाठी आणि कमकुवत लोकांचे संरक्षण आणि त्यांना बळ देण्यासाठी राज्य सरकार आणि खासगी संस्थांच्या माध्यमांतून प्रकल्प राबवण्यात येत होते. (USAID)

हेही वाचा :

भाजपकडून पोलिसांचा गैरवापर होण्याची शक्यता
महाराष्ट्रात अख्ख्या हिमाचलएवढे मतदार वाढले कसे?

Related posts

Anahat Qualifies

Anahat Qualifies : अनाहत, वीरला विजेतेपद

Om Prakash

Om Prakash : पोलिस अधिकाऱ्याची राहत्या घरी हत्या

Lodha

Lodha : मंत्री मंगलप्रसाद लोढा निव्वळ नाटक करतात