Home » Blog » Uddhav Thackeray targets Modi  : मोदींच्या ‘शेतकरी हिता’च्या पुळक्यावर उद्धव ठाकरेंचा निशाणा

Uddhav Thackeray targets Modi  : मोदींच्या ‘शेतकरी हिता’च्या पुळक्यावर उद्धव ठाकरेंचा निशाणा

by प्रतिनिधी
0 comments
Uddhav Thackeray targets Modi

नवी दिल्ली : प्रतिनिधी : अमेरिकेने भारताला ५० टक्के टेरिफ लावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही या अमेरिकेला दिलेल्या प्रत्युत्तरावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला. दिल्लीत आलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाच्यावेळी शेतकऱ्यांचे हित का आठवले नाही?, असा प्रश्न उपस्थित केला. (Uddhav Thackeray targets Modi )

पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रत्युत्तर देताना असे म्हटले आहे की “आमच्यासाठी, आमच्या शेतकऱ्यांचे हित हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत शेतकरी, मच्छिमार आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही, असे पंतप्रधानांनी म्हटले होते. दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषद मोदींच्या वक्तव्यावर तुमचे मत काय आहे असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका केली. शेतकरी आपल्या मागण्यासाठी दिल्लीत आले होते त्यावेळी त्यांना दिल्ली सीमेवर मोदी सरकारने रोखले होते. शेतकऱ्यांवर बंदुका रोखल्या होत्या. ते दिल्लीत येऊ नये म्हणून अडथळे उभारले होते. रस्त्यांवर खिळे ठोकले होते. शेतकऱ्यांची तुलना नक्षलवाद्यांशी केली होती. त्यावेळी तुम्हाला शेतकऱ्यांचे हित का आठवले नाही असा प्रश्न ठाकरे यांनी केला. (Uddhav Thackeray targets Modi )

उद्धव ठाकरे हे तीन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. देशात आता अघोषित एनआरसी लागू झाला आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. तसेच, आता व्हीव्हीपॅट काढत असाल तर मग निवडणूक घेतच कशाला आहात? असाही संतप्त सवाल त्यांनी यावेळी विचारला. तसेच एकनाथ शिंदे हेही दिल्ली दौऱ्यावर आहेत, यावर विचारले असता ते म्हणाले की, ते त्यांच्या मालकाला भेटायला आले असतील असे म्हणत त्यांनी शिंदेंना टोला लगावला.

शिंदेंनी ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर भाष्य करत टीका केली होती. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “त्यांच्या विचारांवर किंवा त्यांच्या टीकेला उत्तर देण्याएवढे ते काही महान नाहीत. शेवटी गद्दार तो गद्दारच असतो. गद्दाराच्या मताला मी किंमत देत नाही.” असे म्हणत त्यांनी टीका केली. पुढे ते म्हणाले की, “ते त्यांच्या मालकाला भेटायला आले असतील, त्यामुळे त्यावर बोलण्यात काय अर्थ नाही,” असे म्हणत त्यांनी निशाणा साधला. (Uddhav Thackeray targets Modi )

 “उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला? तसेच राजीनामा दिल्यानंतर ते आहेत कुठे? यावर चर्चा झाली पाहिजे.” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले. ते पुढे म्हणाले की, “प्रत्येक राज्याच्या निवडणुका जेव्हा होत आहेत तेव्हा होणार. बिहारमध्ये मतदार याद्यांचा घोळ झाला त्यात अंतिम निर्णय काय झाला माहीत नाही. पण मतदाराची ओळख त्याने पटवून द्यायची असे काहीतरी ठरल्याचे कळते आहे. देशात अघोषित एनआरसी लागू झाली आहे का? हा प्रश्न यामुळे निर्माण होतो आहे. सीएए आणि एनआरसीचा विषय गाजला होता तेव्हा आंदोलने झाली होती. तेव्हाही हाचा मुद्दा होता. आता निवडणूक आयोगाने याचं स्पष्टीकरण दिले पाहिजे.” अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

 “डोनाल्ड ट्रम्प टॅरिफचा फटका सामान्यांना बसणार आहे. डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशाची खिल्ली उडवत आहेत. आपण त्यांना अवाक्षरानेही उत्तर देत नाही. देशाचे सरकार नेमके चालवतय कोण? मी माझे मत आधीही व्यक्त केले आहे आपल्या देशाला पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री यांची गरज आहे. कारण आत्ताचे पंतप्रधान हे भाजपाचे आहेत. ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतरही मोदी बिहारला गेले, पहलगामला नाही. या सरकारकडे परराष्ट्र नीती वगैरे काही नाही, खंबीर धोरण नाही.” अशी टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. “अमेरिका डोळे वटारत असताना डोवाल रशियाला गेले आहेत. पंतप्रधान चीनला चालले आहेत. चीन बरोबरचे संबंधही त्यांच्या मित्रासाठी दरवाजे उघडतात का? पण हे सगळं होत असलं तरीही परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे,” असे म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला. (Uddhav Thackeray targets Modi )

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00