Home » Blog » शस्त्रसंधीनंतर इराण, इस्त्रायलचे जोरदार हल्ले, प्रतिहल्ले

शस्त्रसंधीनंतर इराण, इस्त्रायलचे जोरदार हल्ले, प्रतिहल्ले

by प्रतिनिधी
0 comments
Intense attacks and counter-attacks between Iran and Israel

नवी दिल्ली : अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये एप्रिलमध्ये झालेल्या शस्त्रसंधीनंतर आज सोमवारी इराण आणि इस्त्रालयने परपस्पराविरोधात जोरदार हल्ले केले. त्यामुळे मध्यपूर्व अशिया पुन्हा युदधाच्या खाईत पडण्याची भिती व्यक्त केली आहे. दोन्ही देशातील हल्ले, प्रतिहल्ल्यामुळे भारतीयांनी इराणमधून  बाहेर पडावे असा इशारा दिला आहे. या हल्ल्यामुळे अमेरिका-इराण शांतता वाटाघाटीवर परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. (Intense attacks and counter-attacks between Iran and Israel)

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युदधविराम असला तरी इस्त्रालयकडून लेबनॉनमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणावर हल्ले सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आज इराणने इस्त्रायलच्या दिशेने ११ क्षेत्रणास्त्रे डागली. या क्षेपणास्त्रांनी नाझथेरजवळील रामात डेव्हिड हवाई तळाला लक्ष्य केले आहे. लेबनॉनमधील इस्त्रायलच्या कारवाया आणि इराणी हितसंबंधांवरील हल्ल्याच्या बदला घेण्यासाठी हल्ले केल्याचा दावा इराणने केला आहे.

इराणीची सर्व क्षेपणास्त्रे रोखण्यात आली आहेत. कोणतीही जिवितहानी झालेली नाही. बंकरमध्ये धाव घेताना अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने सर्व शाळा बंद केल्या आहेत, असे इस्त्रायलने म्हटले आहे. (Intense attacks and counter-attacks between Iran and Israel)

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने उत्तर इस्रायलमधील रामात डेव्हिड हवाई तळावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याचे म्हटले आहे. दक्षिण लेबनॉन आणि बेरूतच्या दक्षिण उपनगरांमध्ये इस्रायलने केलेल्या तीव्र हल्ल्यांचे हे प्रत्युत्तर आहे. लेबनॉनविरुद्धच्या इस्रायली कारवायांना पाठिंबा देण्यासाठी या हवाई तळाचा वापर केला जात असल्याचा दावा तेहरानने केला आहे, तसेच हल्ले सुरूच राहिल्यास व्यापक प्रत्युत्तराचा इशाराही दिला आहे.

इराणच्या निम सरकारी मेहर न्यूजने असे म्हटले आहे की इरानने ‘ऑपरेशन नसर’ या लष्करी मोहिमेत इस्त्रायलच्या सर्वात महत्वाच्या नेमातिम आणि तेफ नोफ हवाई तळांना लक्ष केले आहे असे वृत्त दिले आहे. (Intense attacks and counter-attacks between Iran and Israel)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00