Home » Blog » इतर नेत्यांचा नियम मला का लागू होत नाही? ; छगन भुजबळांची खंत

इतर नेत्यांचा नियम मला का लागू होत नाही? ; छगन भुजबळांची खंत

by प्रतिनिधी
0 comments
The regret expressed by Chhagan Bhujbal

जमीर काझी : मुंबई :  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अखेर माजी आमदार राजेद्र जैन यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. अखेरच्या मूर्तीपर्यंत त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. मात्र  या जागेसाठी इच्छुक नेते व मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा डावलण्यात आल्याने त्यांनी प्रथमच उघडपणे खंत व्यक्त केली आहे. (The regret expressed by Chhagan Bhujbal)

 भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्याबरोबरच आपल्या पुतण्याला माजी खासदार समीर भुजबळ यांना  मंत्रीपद देण्याची अट घातली होती. मात्र  भाजपा नेतृत्वाने या  प्रस्तावाला नकार दिल्याने  राष्ट्रवादीने  जैन यांना उमेदवारी देण्याची घोषणा रविवारी रात्री केली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सोमवारी जैन यांचा अर्ज भरताना भुजबळ हेही इतर नेत्यांसमवेत उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपण नाराज नसल्याचे सांगतानाच आपल्या मनातील  खंत उघडपणे बोलून दाखवली. ते म्हणाली, “मला राज्यसभा आणि लोकसभेत जाण्याची इच्छा होती. चार-पाच वेळा संधी आली, पण दुर्दैवाने ती मिळाली नाही. यावेळीही प्रयत्न केला होता. मकरंद पाटील मंत्री आहेत, त्यांचे भाऊ खासदार आहेत. सुनेत्रा पवार मंत्री आहेत, त्यांचा मुलगा खासदार आहे. तटकरे खासदार आहेत, तर त्यांचा मुलगा आमदार आहे. मग हाच नियम मला का लागू होऊ नये, एवढीच माझी भूमिका होती. असे स्पष्ट करून ते म्हणाले की, “हा प्रस्ताव वरिष्ठ स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी काही वेळ लागला असावा. भाजपाकडे प्रस्ताव गेला होता. मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी त्यावर विचार करू, असं सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी प्रस्ताव नाकारला, असे म्हणण्यात तथ्य नाही. मी नाराजही नाही. इतरांना जो न्याय लावला जातो, तोच न्याय मला मिळावा, अशी माझी अपेक्षा होती. त्यात अन्याय काय आहे?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (The regret expressed by Chhagan Bhujbal)

जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल

राज्यसभेसाठी माजी आ. राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीप वळसे- पाटील, युवा नेते खा. पार्थ पवार  महायुतीतील मंत्री आशिष शेलार, मंत्री भरत गोगावले यांच्यासह पक्षाचे अनेक आमदार उपस्थित होते. (The regret expressed by Chhagan Bhujbal)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00