Home » Blog » Firing of MLA’s brother : आमदाराच्या भावाचा नर्तकीबरोबर नाचताना गोळीबार

Firing of MLA’s brother : आमदाराच्या भावाचा नर्तकीबरोबर नाचताना गोळीबार

by प्रतिनिधी
0 comments
Firing of MLA's brother

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एका कला केंद्रात सत्ताधारी महायुतीतील आमदाराच्या भावाने कला केंद्रात नर्तकीसोबत  नाचताना हवेत गोळीबार केला. त्यामध्ये कोणी जखमी झाले नसले तरी नर्तिका बेशुद्ध पडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आमदाराच्या भावासह तिघांना अटक केली. आमदार रोहित पवार यांनी आमदाराच्या भावाने गोळीबार केल्याचा दावा केला होता. (Firing of MLA’s brother)

दौंड तालुक्यातील यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अंबिका कला केंद्रात गोळीबाराची घटना घडली. कला केंद्राचा व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बाबासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे आणि एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. कला केंद्रात नाचताना बाळासाहेब हिरामन मांडेकर याने नाचताना बंदूक काढून हवेत गोळीबार केला होता. या प्रकरणातील आरोपीवर जमल्यास मकोका लावा, अशा सूचना राज्याचे उप मुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना दिल्या आहेत. (Firing of MLA’s brother)

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “दौंड प्रकरणावर मी पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. तिथे कोणीही जखमी झालेले नाही. त्या ठिकाणी गोळीबार झाला. ते बघून एक महिला बेशुद्ध पडली. तिला पाणी देऊन शुद्धीवर आणले. यामध्ये कोणालाही इजा झालेली नाही. या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ देऊ नका, अशा सूचना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दिल्या आहेत. मी पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून या प्रकरणात जी नावे समोर येतील त्यांना अटक करा, ते कोणाच्याही संबंधित असू द्या. तो आमदार शंकर मांडेकरांचा सख्खा भाऊ नाही. तो चुलत भाऊ असण्याची शक्यता आहे. सर्व गोष्टींचा तपास करण्यास सांगितले आहे. जमले तर मकोका पण लावा,” असे त्यांनी आदेश दिले आहेत. (Firing of MLA’s brother)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00