Home » Blog » उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

राजकीय विश्वात चर्चांना उधाण

by प्रतिनिधी
0 comments
Uddhav Thackeray News

मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणूकपुर्व व निवडणूक निकालानंतर एकमेकावर केलेल्या टीकेमुळे चर्चेचा विषय बनलेले हा महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज (दि.१७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. नागपूरात हिवाळी अधिवेशनात ठाकरेंनी आज हजेरी लावली होती. दुपारी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन त्यांचे अभिनंदन केले. (Uddhav Thackeray)

२०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपा व शिवसेना युती तुटल्यापासून उद्धव ठाकरे व फडणवीस यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. तेव्हापासून त्यांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती. विधानसभा निवडणूक काळात त्यांनी एकमेकांवर कडाडून टीका व आरोप प्रत्यारोप केले होते. ५ डिसेंबरला आझाद मैदानावर झालेल्या शपथविधीसाठी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून निमंत्रण दिले होते. मात्र, ते गैरहजर राहिले. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे नागपूरला आले. त्यांनी सभागृहाच्या कामकाजात भाग घेतला. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री दालनात जाऊन देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.

यावेळी युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आ. आदित्य ठाकरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते, आ. अनिल परब, आ. भास्कर जाधव, आ. सचिन अहिर, आ. संजय पोतनीस, आ. वरुण सरदेसाई उपस्थित होते. (Uddhav Thackeray)

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00