Home » Blog » Mohan Bhagawat : लोकांचे रक्षण करण्याचे कर्तव्य राजाने पार पाडावे

Mohan Bhagawat : लोकांचे रक्षण करण्याचे कर्तव्य राजाने पार पाडावे

संघ सरसंचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

by प्रतिनिधी
0 comments
Mohan Bhagawat

नवी दिल्ली : राजाचे कर्तव्य आहे लोकांचे रक्षण करणे आणि राजाने त्याचे कर्तव्य बजावले पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंचालक मोहन भागवत यांनी  शनिवारी (२६ एप्रिल) व्यक्त केले. भागवत यांनी यावेळी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. (Mohan Bhagawat)

विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि जागतिक हिंदू काँग्रेसचे प्रणेते स्वामी विज्ञानानंद यांनी लिहिलेल्या ‘द हिंदू मॅनिफेस्टो’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते दिल्लीत बोलत होते.

 “आपण अत्याचारी लोकांकडून मार खाऊ नये आणि गुंडांना धडा शिकवावा, असा आमचा धर्म सांगतो,” असे सांगून भागवत यांनी “राजाचे काम लोकांचे रक्षण करणे आहे आणि त्याने त्याचे कर्तव्य बजावले पाहिजे,” असे स्पष्ट केले. (Mohan Bhagawat)

रामायणातील रावणाचे उदाहरण देताना भागवत म्हणाले की, त्याच्यात ‘‘सर्वोत्तम’’ राजा बनण्याचे सर्व गुण होते, मग तो एक महान प्रशासक असो किंवा शिवाचा अनुयायी असो किंवा त्याची विद्वत्ता असो. रावणात सर्व काही होते, पण त्याला मरावे लागले कारण तो या गुणांचा चांगल्यासाठी वापर करत नव्हता, असे ते म्हणाले.

 “तुम्ही काहीही केले तरी रावणाला चांगला माणूस होता येत नाही हे माहीत होते. मग, फक्त एकच पर्याय उरला होता – त्याचे सध्याचे शरीर नष्ट करावे जेणेकरून त्याला दुसरा आत्मा आणि शरीर मिळेल. म्हणूनच देवाने त्याला मारले आणि ही हत्या हिंसा नाही; ती फक्त अहिंसा आहे,” असे भागवत म्हणाले. (Mohan Bhagawat)

“भारताचा स्वभावधर्म अहिंसा आहे. आपली अहिंसा लोकांना बदलणे ही आहे. लोकांना अहिंसक बनवणे आहे, पण काही लोक कधीही बदलू शकत नाहीत. तुम्ही त्यांच्यासाठी जे काही शक्य आहे ते केले तरी ते बदलणार नाहीत. ते जगात उपद्रव निर्माण करत राहतील. या परिस्थितीत कोणी काय करू शकते?,” असा प्रश्न भागवत यांनी उपस्थित केला.

हेही वाचा :
गुजरातेत सापडले हजारावर बांगलादेशी
चौकीदाराने प्रामाणिक काम केले नाही

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00