Home » Blog » Pope Buried : शोकाकुल वातावरणात पोप फ्रान्सिस यांचा दफनविधी

Pope Buried : शोकाकुल वातावरणात पोप फ्रान्सिस यांचा दफनविधी

जागतिक नेत्यांसह लाखोंनी दिला अखेरचा निरोप

by प्रतिनिधी
0 comments
Pope Buried

व्हॅटिकन सिटी : जगभरातील प्रमुख नेत्यांसह लाखोंच्या उपस्थितीत पोप फ्रान्सिस यांना शनिवारी (२६ एप्रिल) त्यांच्या आवडत्या रोम चर्चच्या आवारामध्ये दफन करण्यात आले. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह प्रमुख देशांचे महत्त्वाचे नेते यावेळी उपस्थित होते. (Pope Buried)

पोप यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सेंट पीटर्स स्क्वेअर येथे सुमारे चार लाख नागरिक जमले होते. रोम बॅसिलिकामधील सँटा मारिया मॅगिओर येथे पोप यांचे दफन करण्यात आले. स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी १ वाजता तीस मिनिटांचे विधी केल्यानंतर पोप यांचे कॉफीन दफन करण्यात आले. २१ एप्रिल रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी पोप यांचे निधन झाले होते. न्यूमोनिया बळावल्यामुळे पोप यांचे निधन झाले होते. तत्पूर्वी, २० एप्रिल रोजी ईस्टर संडेनिमित्त पोप यांनी अखेरचे दर्शन दिले होते. (Pope Buried)

“पोप फ्रान्सिस त्यांच्या भाषणांचा आणि वैयक्तिक भेटीगाठींचा शेवट, ‘माझ्यासाठी प्रार्थना करायला विसरू नका,’ असा करायचे. आता प्रिय पोप फ्रान्सिस तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करावी, असे आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्ही चर्चला, रोमला आशिर्वाद द्यावेत. मागील आठवड्यामध्ये तुम्ही बॅसिलिकाच्या सज्जेतून ज्याप्रमाणे अंतिम आशिर्वाद दिले होते, त्याचप्रमाणे तुम्ही स्वर्गातूनही संपूर्ण जगाला आशिर्वाद द्यावेत, अशी प्रार्थना यावेळी कॉलेज ऑफ कार्डिनल्सचे डीन कार्डिनल जिओव्हॅनी बॅटिस्टा रे यांनी केली. (Pope Buried)

दरम्यान, पोप यांच्या दफनविधीवेळी ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलादिमिर झेलेन्स्की यांचीही भेट झाली. त्यांच्यामध्ये काही मिनिटांपुरत्या झालेल्या चर्चेनेही प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेतले.
हेही वाचा :
गुजरातेत सापडले हजारावर बांगलादेशी
पहेलगाम हल्ल्याच्या ‘तटस्थ चौकशी’साठी तयार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00