मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यात मृत पाळीव प्राण्यांना इतरत्र टाकले जाते. परिणामी दुर्गंधी आणि आजार फैलावतात. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य शासनाने एक निर्णय जारी केला आहे. त्यानुसार या सर्व मृत पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी सशुल्क स्मशानभूमी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. असा पहिला प्रयोग ठाणे व मीरा-भाईंदरमध्ये करण्यात येणार आहे. (cemetery for pets)
नगर विकास विभागाने त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात विधिमंडळात प्रश्न विचारला होता. त्यानंतर त्याचा पाठपुरावा केला होता.
कुत्रे, मांजर, पांढरे उंदीर इतर गोवंशीय पाळीव प्राणी यांची वयोमर्यादा कमी असते. मृत्यूनंतर या प्राण्यांच्या शरीराची योग्य विल्हेवाट न लावल्यास दुर्गंधी पसरते. रोगराई पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला समोर जावे लागते. या पार्श्वभूमीवर घनकचरा व्यवस्थापन केंद्राशेजारी पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना नगरविकास विभागाने दिल्या आहेत. तसेच या संदर्भात मार्गदर्शक सूचना आखलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी असे स्पष्ट केले आहे.(cemetery for pets)
पहिला प्रयोग ठाणे व मीरा -भाईंदरमध्ये
पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याचा पहिला प्रयोग मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून ठाणे आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये करण्यात येत आहे. या दोन्ही महापालिकेच्या हद्दीतील स्मशानभूमीजवळ असलेल्या राखीव जागेत गॅस दाहिनीच्या माध्यमातून पाळीव प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी संयंत्र बसवले आहेत. त्याचे लवकरच उद्घाटन होणार आहे. या निर्णयाचे स्वागत अनेक प्राणीमित्रांनी केले आहे.(cemetery for pets)
- अशा आहेत मार्गदर्शक सूचना
- स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी दिलेल्या जागेभोवती संरक्षण भिंत बांधावी.
- सुरक्षा व्यवस्था पुरवावी, प्राण्यांची अंत्यविधी करताना योग्य ती दक्षता घ्यावी
- दुर्गंधी निर्माण होणार नाही, इतर आजार पसरणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
- मृत पाळीव प्राणी इतर ठिकाणी टाकले जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. ठाराविक शुल्क आकारून पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी नागरिकांना परवानगी द्यावी.
हेही वाचा :
गुजरातेत सापडले हजारावर बांगला देशी
भीषण आगीत बारा गोदामे खाक