Home » Blog » weapons seized: कुपवाडात मोठा शस्त्रसाठा जप्त

weapons seized: कुपवाडात मोठा शस्त्रसाठा जप्त

दहशतवाद्यांची आश्रयस्थाने केली उद्ध्वस्त

by प्रतिनिधी
0 comments
weapons seized

नवी दिल्ली : सुरक्षा दलांनी शनिवारी (२६ एप्रिल) जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांचा अड्डा उध्वस्त केला. मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. (weapons seized)

पहेलगामजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर सुरक्षा दलांनी खोऱ्यात शोधमोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेदरम्यान अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त केल्यानंतर तेथे मोठा शस्त्रसाठा सापडला.

गुप्तचरांच्या माहितीच्या आधारे, उत्तर काश्मीर जिल्ह्यातील मुश्ताकाबाद माछिल (समशा बेहक वन प्रदेश) येथील सेदोरी नाला या जंगली भागात सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. (weapons seized)

त्यांनी सांगितले की, या कारवाईदरम्यान दहशतवाद्यांचा एक अड्डा यशस्वीरित्या शोधण्यात आला. तो उद्ध्वस्त करण्यात आला.

घटनास्थळावरून पाच एके-४७ रायफल, आठ एके-४७ मॅगझिन, एक पिस्तूल, एक पिस्तूल मॅगझिन, ६६० राउंड एके-४७ दारूगोळा, एक पिस्तूल राउंड आणि ५० राउंड एम४ दारूगोळा जप्त करण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे एक मोठे यश होते, विशेषतः या प्रदेशातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या उद्देशाने दहशतवादी या प्रदेशात कारवाया करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत लक्षात घेता सुरक्षा दलाचे हे मोठे यश आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

सुरक्षा दलांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावले गेले. त्यामुळे नागरिक आणि सार्वजनिक सुरक्षेचे संभाव्य धोके टळले आहेत, असे ते म्हणाले. (weapons seized)

दहशतवादी आणि त्यांच्या सहानुभूतीदारांची घरे उद्ध्वस्त
दरम्यान, दहशतवादी आणि त्यांच्या सहानुभूतीदारांविरोधात सुरक्षा दलांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान दहशतवादी आणि त्यांच्या सहानुभूतीदारांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली. शेकडो लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवाद्यांच्या सुरक्षित आश्रयस्थानांवर छापे टाकले आहेत. त्यांना मदत करणाऱ्या किंवा त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगणाऱ्या शेकडो लोकांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा :
गुजरातेत सापडले हजारावर बांगलादेशी
 दहशतवाद्यांविरोधातील कारवायांचे लाईव्ह कव्हरेज टाळा


You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00