Home » Blog » डी. वाय. पाटील विद्यापीठाचे दोन संशोधक ‘टॉप टेन’ मध्ये

डी. वाय. पाटील विद्यापीठाचे दोन संशोधक ‘टॉप टेन’ मध्ये

0 comments
Two Researchers from D.Y. Patil University in the 'Top Ten

कोल्हापूर : पदार्थ विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील सर्वोत्कृष्ट संशोधकांच्या यादीत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरच्या दोन संशोधकाने ‘टॉप टेन’ मध्ये स्थान मिळवले आहे. रिसर्च डॉट  कॉम या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन मूल्यमापन संस्थेने जाहीर केलेल्या या यादीत सेंटर फॉर इंटरडीसीप्लेनरी स्टडीजचे अधिष्ठाता डॉ. सी.डी.लोखंडे तिसरे तर संशोधन संचालक डॉ.प्रमोद एस.पाटील यांनी आठवे स्थान मिळवले आहे. 

रिसर्च डॉट कॉम च्या अहवालानुसार, देशातील अव्वल संशोधकांची निवड करण्यात आली. डॉ. लोखंडे यांचा डी  इंडेक्स,  १०८ असून त्यांच्या संशोधन कार्याला ४१ हजार ७६४ हून अधिक संदर्भ प्राप्त झाले आहेत. जागतिक क्रमवारीत त्यांचा ७२५ वा क्रमांक आहे. तर डॉ. प्रमोद पाटील यांचा डी इंडेक्स ९१ असून त्यांच्या संशोधनाला २९ हजार १६० हून अधिक संदर्भ मिळाले आहेत. जागतिक स्तरावर त्यांना १५५४ वा क्रमांक प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर विद्यापीठाचे संशोधक डॉ. उमाकांत पाटील यांनीही या यादीत १८५ वे स्थान मिळवले आहे. त्यांचा डी इंडेक्स ४९ असून  त्यांच्या संशोधनाला ६९४१ संदर्भ मिळाले आहेत. (Two Researchers from D.Y. Patil University in the ‘Top Ten)

या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी संशोधकांचे अभिनंदन करताना सांगितले की विद्यापीठाने नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संशोधन आणि नवसंकल्पनांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. डॉ. लोखंडे आणि डॉ. प्रमोद पाटील यांनी मिळवलेले हे यश विद्यापीठासाठी अभिमानास्पद असून संशोधन  कार्याला  आणखी  गती मिळेल. संशोधनाच्या माध्यमातून समाजोपयोगी तंत्रज्ञान विकसित करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न यापुढेही अधिक ताकदीने सुरू राहील. (Two Researchers from D.Y. Patil University in the ‘Top Ten)

या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ.  राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी डॉ. लोखंडे आणि डॉ. पाटील यांचे अभिनंदन केले. (Two Researchers from D.Y. Patil University in the ‘Top Ten)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00