‘या’ राज्यांना चक्रीवादळाचा तडाखा बसणार

Cyclone Dana

नवी दिल्ली : अंदमान समुद्रातून उगम पावलेले दाना चक्रीवादळ बुधवारपर्यंत (दि.२३) बंगालच्या उपसागरात पोहोचेल. २४ ऑक्टोबर रोजी ते ओडिशा-पश्चिम बंगाल किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने चक्रीवादळाच्या भूभागाबाबत माहिती दिलेली नाही. त्याचा फटका पुरीला बसू शकतो, असा अंदाज आहे. (Cyclone Dana)

हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांच्या मते, २३ ऑक्टोबरपासून ओडिशा-पश्चिम बंगाल किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग ६० किलोमीटर/ताशी पोहोचेल, तो २४ ऑक्टोबरच्या रात्रीपासून २५ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत १२० किलोमीटर/ताशी वाढेल. ‘आयएमडी’चे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले, की ओडिशा-बंगालच्या किनारपट्टी भागात २४-२५ ऑक्टोबरला काही ठिकाणी २० सेंटीमीटर पाऊस पडू शकतो. तर, काही ठिकाणी ३० सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने ओडिशा-बंगालमधील मच्छीमारांना २३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.

पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर, पश्चिम मेदिनीपूर, दक्षिण २४ परगणा आणि उत्तर २४ परगणा येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर कोलकाता, हावडा, हुगळी आणि झारग्राममध्ये २३ ते २४ ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओडिशात २४ ऑक्टोबर रोजी पुरी, खुर्दा, गंजम आणि जगतसिंगपूर जिल्ह्यांसाठी अत्यंत मुसळधार पावसासह (७ ते २० सेंटीमीटर) अति मुसळधार पाऊस (२० सेंटीमीटरपेक्षा जास्त) आणि विजांचा कडकडाट होण्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान बुलेटिनमध्ये म्हटले आहे, की आंध्र प्रदेशातही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विविध दले सज्ज

ओडिशा सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अलर्टवर ठेवले आहे. महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुरेश पुजारी म्हणाले की, राज्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. ओडिशा आपत्ती जलद कृती दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी सज्ज आहेत. (Cyclone Dana)

मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई

बंगालच्या विविध जिल्ह्यांमध्ये मंगळवारपासून पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत पाऊस सुरू राहू शकतो. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. पूर्व मेदिनीपूर आणि दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. राज्याचे मुख्य सचिव मनोज पंत यांनी बाधित होण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

हेही वाचा :

Related posts

Mohan Bhagawat

Mohan Bhagawat : लोकांचे रक्षण करण्याचे कर्तव्य राजाने पार पाडावे

weapons seized

weapons seized: कुपवाडात मोठा शस्त्रसाठा जप्त

I&B advisory

I&B advisory: दहशतवाद्यांविरोधातील कारवायांचे लाईव्ह कव्हरेज टाळा