निवृत्तीनंतर मैदानात परतले ‘हे’ खेळाडू; जाणून घेवूयात त्यांच्याबद्दल

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारतीय संघ या महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे. यात पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या महत्वाच्या मालिकेपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला खेळाडू डेव्हिड वॉर्नर मोठे वक्तव्य केले आहे.

डेव्हिड वॉर्नर म्हणाला की, संघाला माजी गरज भासल्यास क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करू शकतो. वॉर्नरने यावर्षी पाकिस्तानविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेनंतर ४ महिन्यांपूर्वी निवृत्तीची घोषणा केली होती. निवृत्तीनंतर डेव्हिड वॉर्नर मैदानात परतला तर ही कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरणार नाही. त्याच्या आधीही जगातील अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटूंनी निवृत्तीनंतर क्रिकेटच्या मैदानावर परतले आहेत. जाणून घेवूयात अस करणाऱ्या दहा खेळाडूंबद्दल…

बॉब सिम्पसन

यादीत पहिले नाव आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू बॉब सिम्पसन यांचे. बॉब यांनी आपल्या कारकिर्दीत ५२ कसोटी सामने खेळून १९६८ मध्ये निवृत्ती घेतली होती. परंत, १९७७ मध्ये त्यांनी मैदानात पुनरागमन करत ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केले होते.

इम्रान खान

पाकिस्तानला विश्वचषक विजेतेपद मिळवून देणारे क्रिकेटपटू इम्रान खान हेही निवृत्तीनंतर मैदानात परतले आहेत. १९८७ साली झालेला विश्वचषक गमावल्यानंतर त्यांनी निवृत्तीची घोषणा केली होती, परंतु काही काळानंतर पुन्हा मैदानात उतरून त्यांनी १९९२ साली पाकिस्तानला विश्वविजेता बनवले होते.

जावेद मियांदाद

या यादीत आणखी एका पाकिस्तानी खेळाडूचे नाव आहे. ते म्हणजे पाकिस्तानी दिग्गज खेळाडू जावेद मियांदाद. मियांदाद यांनी क्रिकेटला अलविदा केला होता, परंतु, तत्कालीन पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या विनंतीनंतर ते पुन्हा मैदानात उतरले.

कार्ल हॉपर

कॅरेबियन दिग्गज क्रिकेटपटू कार्ल हूपरने यांनीही निवृत्तीनंतर पुनरागमन केले आहे. १९९९ च्या विश्वचषकापूर्वी त्यांनी निवृत्तीची घोषणा केली होती, परंतु २००१ त्यांनी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. यानंतर त्यांनी २००३ साली वेस्ट इंडिजचे कर्णधारपदही भूषवले होते.

अंबाती रायुडू

यादीत माजी भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायडूचाही समावेश आहे. रायुडूला २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी दुर्लक्षित करण्यात आले होते. तेव्हा त्याने निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, काही दिवसांनी तो मैदानात परतला. त्यानंतर त्याने अनेक देशांतर्गत स्पर्धा आणि आयपीएलमध्ये भाग घेतला.

ब्रेंडन टेलर

ब्रेंडन टेलरने कौलपॅक करारावर स्वाक्षरी केल्यानंतर त्याच्या संघातून निवृत्त झाला, परंतु एक-दोन वर्षांनी हा करार संपला. त्यानंतर तो पुन्हा आपल्या संघाच्या वतीने मैदानात खेळायला लागला.

केविन पीटरसन

यादीत माजी इंग्लिश फलंदाज केविन पीटरसनचेही नाव आहे. पीटरसनने २०११ मध्ये पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, परंतु काही महिन्यांनंतर तो मैदानात परतला.

ड्वेन ब्राव्हो

वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता, पण २०२१ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकासाठी तो पुन्हा मैदानात परतला.

मोईन अली

या यादीत मोईन अलीचेही नाव आहे. निवृत्तीनंतर तो इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये परतला, पण आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेतली आहे.

शाहिद आफ्रिदी

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक वेळा निवृत्तीनंतर परतण्यासाठी ओळखला जातो. २००६ मध्ये त्याने पहिल्यांदा कसोटीतून निवृत्ती घेतली. त्यानंतर २०११ मध्ये त्याने वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. परंतु, दरवेळी निवृत्ती घेतल्यानंतर तो दरवेळी मैदानात परतला.

हेही वाचा :

Related posts

Pak Series win : पाकचे निर्भेळ यश

Indian women’s win : भारताचा मोठा विजय

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’