Home » Blog » Eknath Shinde : मला जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न झाले : एकनाथ शिंदे

Eknath Shinde : मला जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न झाले : एकनाथ शिंदे

शायरी म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा

by प्रतिनिधी
0 comments
Eknath Shinde

नागपूर; विशेष प्रतिनिधी : महायुती सरकारच्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात आज (दि.२१) अंतिम प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी केली. बीड, परभणी, नक्षलवादाच्या मुद्द्यांसह विरोधकांनाही लक्ष्य केले. आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच त्यांनी शायरीतून ठाकरेंवर निशाणा साधला. ‘तुफानों मे कश्तीया और घमंड मे बडी बडी हस्तीया डुब जाती है’. अशी शायरी सादर करत शिंदेंनी भाषणाला सुरुवात केली. (Eknath Shinde)

बीड, परभणीवरुन राज्यात उपस्थित झालेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन भाष्य केले. तसेच, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मला तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न झाले, तर महाराष्ट्रात २०२५ पर्यंत सगळा नक्षलवाद संपणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. असे विरोधक म्हणत आहेत. परंतु, त्यांच्या काळात गृहमंत्री अटकेत होता. साधू हत्याकांड झाले आणि ही मंडळी कायदा सुव्यवस्था विषयावर बोलत आहेत. (Eknath Shinde)

महाविकास आघाडी काळात पोलीस यंत्रणेचा बेसुमार वापर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील खोट्या केसमधे अडकविण्याचा प्रयत्न झाला. त्यामधे काही मंत्री देखील होते. मला देखील अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा हे आपल्याला यावरून पहायला मिळाले, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडी सरकारमधील घडलेल्या घटनांवर भाष्य करत काही गौप्यस्फोटही केले. (Eknath Shinde)

मला जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न झाले

बीड-परभणी प्रकरणात कुणालाही सोडले जाणार नाही. मी महाविकास आघाडीत होतो, तिथ मला खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमधे टाकण्याचा प्लॅन सुरू होता, अंबादास आपल्याला माहिती आहे, किती त्रास झाला ते असा गौप्यस्फोटही एकनाथ शिंदेंनी सभागृहात केला. राज्याचे विधानसभेचे अवर म्हणजे काही गप्पा मारण्याचे ठिकाण नाही. बदलापूर घटनेचा विषय निघाला, त्यावेळी काही जणांनी रेल्वे ट्रॅकवर जाऊन रेल्वे अडवली. आम्ही आरोपीला फाशी देतो म्हटले. मात्र, पोलिसांनी ज्यावेळी आरोपीचा एन्काऊंटर केला तेव्हा आरोपीच्या बाजूने हे लोक राहिले, असा टोला विरोधकांना लगावला. औषध खरेदीबाबत आरोप करण्यात आले, दोषींवर आम्ही योग्य कारवाई करू, असेही त्यांनी सांगितले.

२.१३ लाख रोजगार निर्मित्ती

मागच्या अधिवेशनात श्वेतपत्रिका उद्योग विभागाची काढली होती. आमच्याकडे हिम्मत होती म्हणून निर्णय घेतला. २ लाख १३ हजार रोजगार निर्मिती राज्यात होणार आहे. राज्यात २ लाख ४३ हजार कोटीची गुंतवणूक राज्यात आली आहे. (Eknath Shinde)

२०२५ पर्यंत नक्षलवाद संपणार

मला नक्षलवाद्यांची धमकी आली होती, मी विकासाचा मुद्दा समोर ठेऊन काम करत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत बैठक घेतली होती. आपल्या इकडचे नक्षलवादी छत्तीसगढला पळून जायचे आणि जंगलात लपून रहाचे. कारण, काँग्रेस सरकार त्यांना लपायला मदत करत होते. मात्र, आता २०२५ पर्यंत महाराष्ट्रातील सगळा नक्षलवाद संपून जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00