कोल्हापूर : प्रतिनिधी : माजी महापौर सई खराडे यांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. खराडे यांच्या प्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो. आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडवण्यासाठी कंबर कसली असून काँग्रेस पक्षातून शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होण्याची शक्यता आहे. (Sai Kharade’s entry into Shiv Sena)
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुन्हा एक जोरदार धक्का काँग्रेसला दिला आहे. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी महापौर सई खराडे आणि शिवाजी पेठ प्रभागातून इच्छुक असणारे त्यांचे चिरंजीव शिवतेज खराडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत आडगुळे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांचे भगवा ध्वज देवून शिवसेनेत त्यांचे स्वागत केले. (Sai Kharade’s entry into Shiv Sena)
माजी महापौर सौ.सई खराडे यांनी यापूर्वी चंद्रेश्वर प्रभागातून दोनवेळा कोल्हापूर महानगरपालिकेत प्रतिनिधित्व केले आहे. त्या माजी कृषी मंत्री कै.श्रीपतराव बोंद्रे यांची पुतणी, तर काँग्रेसचे जेष्ठ नेते कै.महिपतराव बोंद्रे यांची कन्या आहेत. कॉंग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष कै.सखाराम बापू खराडे यांच्या त्या स्नुषा आहेत. सई खराडे चिरंजीव शिवतेज खराडे हे सद्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवार आहेत. माजी महापौर महादेवराव आडगुळे यांचे चिरंजीव इंद्रजीत आडगुळे यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतला. या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढणार आहे. यावेळी माजी आमदार सुजित मिणचेकर हे उपस्थित होते. (Sai Kharade’s entry into Shiv Sena)