Home » Blog » ED office : ईडी कार्यालय इमारतीला आग

ED office : ईडी कार्यालय इमारतीला आग

कोणतीही जिवितहानी नाही

by प्रतिनिधी
0 comments
ED office

मुंबई : प्रतिनिधी :  दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट परिसरातील ईडी कार्यालयाच्या कैसर ए हिंद इमारतीत रविवारी पहाटे मोठी आग लागली.  आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पण आगीमध्ये महत्वाच्या कागदपत्रांना झळ लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  (ED office)

अधिकाऱ्यांनी सांगितले की, अग्निशमन दलाला करिमभॉय रोडवरील ग्रँड हॉटेलजवळील अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालय असलेल्या बहुमजली कैसर-ए-हिंद इमारतीत पहाटे अडीच वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. पहाटे साडेतीनच्या सुमारास, आग लेव्हल-२ मध्ये वाढली,  अशी माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाने केली. एका महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आग पाच मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत मर्यादित होती.  अधिकाऱ्याने सांगितले की, आठ अग्निशमन इंजिन, सहा जंबो टँकर, एक एरियल वॉटर टॉवर टेंडर, एक श्वासोच्छवास उपकरणे व्हॅन, एक बचाव व्हॅन, एक जलद प्रतिसाद वाहन आणि १०८ सेवेची एक रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे. (ED office)

हेही वाचा :

जहाजविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00