नवी दिल्ली; वृत्तसंस्था : टोमॅटो, कांदा आणि कोथिंबिरीनंतर आता लसणाच्या दराचा परिणाम खिशावर होणार आहे. किरकोळ बाजारात लसणाचा दर किलोमागे ४०० रुपयांवर पोहोचला आहे, तर ऑनलाइन लसणाच्या दराने ५०० रुपये किलोचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे फोडणी महाग झाली आहे. (Garlic Price)
अतिवृष्टीमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये लसणाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. लसणाच्या आवकेसाठी भारत सध्या अफगाणिस्तानवर अवलंबून असल्याची स्थिती आहे. आशियातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधून लसणाची आवक होते; परंतु या वर्षी पावसाने अनेक वर्षांचे विक्रम मोडीत काढले. त्याचा अंदाज शेतकऱ्यांनाही घेता आला नाही आणि त्यांचे उभे लसणाचे पीक उद्ध्वस्त झाले. अफगाण लसणाची रोज आवक होत आहे. हिमाचलमधील काही शेतकऱ्यांनी आपला लसूण ‘कोल्ड स्टोरेज’मध्ये ठेवला होता. तो आता बाजारात विक्रीसाठी आणला जात आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानातून दररोज १०-२० कंटेनर बाजारात येत आहेत; पण त्यांना मालाची किंमतीपेक्षा ‘कस्टम ड्युटी’ जास्त भरावी लागते. याचे कारण म्हणजे भारतात बंदी असलेला चीनी लसूण बंगाल, उत्तर प्रदेश आणि नेपाळला लागून असलेल्या भागातून चुकीच्या पद्धतीने बाजारात आणला जात होता. (Garlic Price)
आझादपूर मंडीच्या ‘भाजीपाला असोसिएशन’चे सरचिटणीस अनिल मल्होत्रा यांनी सांगितले की, चीनी लसणाबाबत तक्रारी आल्यावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानातून येणाऱ्या लसणावरही कडक कारवाई केली. तो अमृतसरमार्गे पाकिस्तानातून आझादपूर बाजारपेठेत विक्रीसाठी आणला जातो. यामुळे हा लसूण जेवढा भारतात विक्रीसाठी आणला जातो, त्यापेक्षा जास्त हमीभाव त्यांना द्यावा लागतो; मात्र कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्यांचे पैसे त्यांना परत केले जातात; परंतु देय देण्यापूर्वी, त्यांचा लसूण अनेक वेळा सडतो आणि खराब होतो.
स्टँड अलोन फोटो-रेन नावाने
ओळी-चेन्नई : दक्षिणेकडील चारही राज्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. रस्त्यांना नद्या, नाल्यांचे स्वरुप आल्याने रस्त्यावर बोटी चालवून नागरिकांची सुटका करण्यात आली.
हेही वाचा :