Tennis : सिनर, फ्रिट्झ तिसऱ्या फेरीत

tennis

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये अग्रमानांकित यानिक सिनर, चतुर्थ मानांकित टेलर फ्रिट्झ हे पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत पोहोचले आहेत. महिला एकेरीमध्ये द्वितीय मानांकित इगा स्वियातेकनेही तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. दरम्यान, पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या एन. श्रीराम बालाजीने मेक्सिकोच्या मिग्युएल रेयेस-वारेलाच्या साथीने स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. (Tennis)

इटलीच्या सिनरला दुसऱ्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या ट्रिस्टन स्कूलकेटविरुद्ध विजय मिळवण्यासाठी २ तास ४६ मिनिटे संघर्ष करावा लागला. सिनरने एका सेटची पिछाडी भरून काढत हा सामना ४-६, ६-४, ६-१, ६-३ असा जिंकला. तिसऱ्या फेरीमध्ये त्याचा सामना अमेरिकेच्या मार्कस गिरॉनशी होईल. अमेरिकेच्या फ्रिट्झला मात्र दुसऱ्या फेरीत विजयासाठी फारसे प्रयास पडले नाहीत. त्याने अवघ्या १ तास २२ मिनिटांमध्ये चिलीच्या ख्रिस्टियन गॅरिनला ६-२, ६-१, ६-० असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. पुढील फेरीत त्याचा सामना फ्रान्सच्या गेल माँफिलिसशी होईल. (Tennis)

महिला एकेरीमध्ये पोलंडच्या स्वियातेकने दुसऱ्या फेरीमध्ये स्लोव्हाकियाच्या रेबेका स्राम्कोवाचा ६-०, ६-२ असा सहज पराभव केला. पुढील फेरीत तिच्यासमोर ब्रिटनच्या एमा रॅडिकानूचे आव्हान आहे. सहाव्या मानांकित कझाखस्तानच्या एलिना रायबाकिनानेसुद्धा दुसऱ्या फेरीत विजय नोंदवताना अमेरिकेच् इव्हा जॉविकला ६-०, ६-३ असे नमवले. तिसऱ्या फेरीत ती युक्रेनच्या डायना यास्त्रेमस्काशी खेळेल. (Tennis)

एन. बालाजीमिग्युएलची विजयी सलामी

भारताच्या एन. श्रीराम बालाजीने मिग्युएल रेयेस-वारेलाच्या साथीने पहिल्या फेरीत रॉबिन हास-अलेक्झांडर नेदोव्येसोव्ह या जोडीवर ६-४, ६-३ अशी मात केली. बालाजी-मिग्युएल जोडीने हा सामना १ तास ३ मिनिटांत जिंकला. दुसऱ्या फेरीत त्यांचा सामना फ्रान्सिस्को कॅब्रल-ननो बोर्जेस या पोर्तुगालच्या जोडीशी होईल. भारताच्या अन्य टेनिसपटूंना मात्र पुरुष दुहेरीच्या पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. जीवन नेदुंचेळीयन-एन. विजयसुंदर प्रसाद या भारतीय जोडीला ग्रेगर जॅक-ऑरलँडो लुझ या जोडीकडून २-६, २-६ अशा पराभवाला सामोरे जावे लागले. युकी भांबरी, ऋत्विक चौधरी बोल्लिपल्ली, अनिरुद्ध चंद्रशेखर हे भारताचे टेनिसपटूही आपापल्या जोडीदारांसोबत पहिल्या फेरीत पराभूत झाले.

हेही वाचा :
बुमराह ठरला ‘प्लेयर ऑफ दि मंथ’

Related posts

Khandoba Talim: खंडोबा, झुंजार संघाचे विजय

Sitanshu Kotak : सितांशू कोटक भारताचे नवे फलंदाजी प्रशिक्षक

India Open : सिंधू, जॉर्ज उपांत्यपूर्व फेरीत