टीम इंडिया पुढील मालिकेसाठी सज्ज

डर्बन : भारतीय संघाला न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत लाजिरवाणा पराभवाला समोरे जावे लागले. न्यूझीलंडने भारतीय संघाला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप दिला. या पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम भारताची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. या पराभवानंतर भारतीय संघ पुढच्या मालिकेसाठी सज्ज झाली आहे. या मालिकेसाठी भारताचा संघ द. आफ्रिकेत दाखल झाला आहे. या मालिकेतील पहिला टी-२० सामना ८ नोव्हेंबरला होणार आहे.

भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांच्या टी-२० मालिकेला ८ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात अनुभवींसह युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या मालिकेतील पहिला टी-२० सामना किंग्समीड मैदानावर होणार आहे. भारतीय वेळेनुसार या सामन्याला रात्री ९.३० ला सुरूवात होणार आहे. मालिकेतील दुसरा सामना १० नोव्हेंबरला गेबेरहा येथील सेंट जॉर्ज पार्क, तिसरा सामना १३ नोव्हेंबरला सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे होईल तर, मालिकेतील शेवटचा सामना जोहान्सबर्ग येथील द वांडरर्स स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेतील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स १८ नेटवर्कवर होणार आहेत. भारतीयांना या सामन्यांचे थेट प्रक्षेपण जिओ सिनेमावर विनामूल्य पाहता येणार आहे.

द. आफ्रिका-भारत यांच्यातील आकडेवारी

यावर्षी झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने द. आफ्रिकेला पराभूत करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. द. आफ्रिकामध्ये भारतीयची चांगली आकडेवारी आहे. आत्तापर्यंत दोन्ही संघांमध्ये २७ टी-२० सामने झाले आहेत. यात भारतीय संघाने १५ सामन्यात विजय मिळवला आहे. तर, द. आफ्रिकेने ११ सामन्यात विजय मिळवला आहे. या मालिकेसाठी भारताचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे आहे. तर दक्षिण आफ्रिकेचे कर्णधारपद एडन मार्करामकडे आहे.

टी-20 मालिकेसाठी दोन्ही संघांचा संघ

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार, अविनाश खान, यश दयाल.

दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली एमपोंगवाना, नकाबा पीटर, रायन रिकेल्टन, लुई सिमेला, लुई सिमेला, ट्रिस्टन स्टब्स.

Related posts

Chinnaswamy

Chinnaswamy : एकाच मैदानावर कोहलीची सर्वाधिक अर्धशतके

Vaibhav

Vaibhav : वैभव सूर्यवंशीला सेहवागचा कडक सल्ला

BCCI Tribute

BCCI Tribute : पहेलगाममधील मृतांना आयपीएलमध्ये श्रद्धांजली