स्वाभिमानी शेतकरींचा सत्यजित पाटील यांना पाठिंबा

शाहूवाडी : प्रतिनिधी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सतत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावरची लढाई केली. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकार दरबारी संघर्ष केला. याच विचारांच्या मुशीतून सर्वसामान्यासाठी लढा देणाऱ्या शाहूवाडी विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील- सरूडकर यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शाहूवाडी पन्हाळा विधानसभा प्रमुख वसंत पाटील यांनी बांबवडे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

महाचिकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील म्हणाले, भविष्यात तालुक्यातील सर्व निवडणुका मानसिंगराव गायकवाड गट, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सर्व समविचारी पक्ष, संघटना एकत्र येऊन लढवतील. उद्याच्या काळातही शेतकरी सर्वसामान्य, कष्टकरी, दीन दलित लोकांचे प्रश्न मांडण्याचे व्यासपीठ शेतकरी संघटनेच्या पाठबळामुळे उपलब्ध झाले आहे. शिवसेना आणि स्वाभिमानी  शेतकरी संघटना हे दोन्ही पक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे आहेत. प्रास्ताविक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश म्हाउटकर यांनी केले. विवेक बच्चे यांनीही मनोगत व्यक्त केले.

भाजपला हद्दपार करा

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची सल मनातून काढण्याची हीच वेळ आहे. शाहूवाडी व पन्हाळ्यातील जनतेला अभिमान वाटेल, चळवळीला कार्यकत्यांला सन्मान, आधार मिळेल असा निर्णय राजू शेट्टी यांनी घेतल्याबद्दल त्यांनी आभार मानले. पैसा लबाडीच्या जोरावर विकासगंगा पोहोचवली असे खोटे सांगितले जात आहे. भाजप विचारांच्या प्रवृत्तीला हद्दपार करण्यासाठी लोकांनी यावेळी सत्यजित पाटील यांना पाठबळ द्यावे असे आवाहन भाई भारत पाटील यांनी केले.

शेतकरी संघटना हे दोन्ही पक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे आहेत. प्रास्ताविक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश म्हाउटकर यांनी केले. विवेक बच्चे यांनीही मनोगत व्यक्त केले. पत्रकार परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जयसिंग पाटील, पद्मसिंह पाटील, रायसिंग पाटील, संतोष पाटील, तालुकाध्यक्ष अजित पाटील, विवेकानंद बच्चे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी