Shahi Snan : शाही स्नान आणि प्रमुख दिवस

Shahi Snan

प्रयागराज : प्रयागराज येथील गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमावर १३ जानेवारीला सुरुवात झाली. मकरसंक्रातीला १५ जानेवारीला शाही स्नान झाले असून २६ फेब्रुवारीपर्यंत हा सोहळा चालणार आहे. देश विदेशातील भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले असून दीड महिन्याच्या कालावधीत अंदाजे ४० कोटी भाविक महाकुंभमेळ्याला भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Shahi Snan)
१५ जानेवारीला पहिले शाही स्नान झाले. पहिल्या शाही स्नानाचा मान नागा साधूंना होता. यापुढील शाही स्नान मौनी अमावस्येला म्हणजेच पौष अमावस्येला,  २९ जानेवारी रोजी होणार आहे. तीन फेब्रुवारीला वसंत पंचमी असून त्यादिवशी शाही स्नानाचा योग आहे. (Shahi Snan)

१२ फेब्रुवारीला माघ पोर्णिमेच्या मुहूर्तावर चौथे शाही स्नान होणार आहे. महाकुंभमेळ्याची सांगता २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला होणार आहे. यादिवशी महाकुंभ मेळ्यातील शेवटचे पाचवे शाही स्नान होणार आहे. गंगा नदीत पवित्र् स्नान करण्यासाठी या तारखांना विशेष महत्व आहे.

हेही वाचा :
कसा बनतो नागा साधू ?

Related posts

Naga Sadhu : कसा बनतो नागा साधू ?

Lauren Powell : लॉरेन पॉवेल झाल्या कमला !

IITian Baba : आयआयटीयन बाबा सत्याच्या शोधात