Home » Blog » russia attack युक्रेनवर रशियाचा सर्वांत मोठा हल्ला

russia attack युक्रेनवर रशियाचा सर्वांत मोठा हल्ला

नाताळच्या दिवशीच डागली ७०वर क्षेपणास्रे

by प्रतिनिधी
0 comments

कीव्ह : रशियाने युक्रेनवर नाताळच्या दिवशीच भयंकर हल्ला केला. जवळपास सत्तरवर क्षेपणास्रे आणि शंभर ड्रोननी हा हल्ला करण्यात आला. त्यामुळे येथील जनतेचा नाताळच्या उत्साह क्षणार्धात काळोखाने भरून गेला. या हल्ल्यामुळे युक्रेमनच्या ऊर्जा केंद्राचे मोठे नुकसान झाले आहे. (russia attack)

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या म्हणण्यानुसार, युक्रेनच्या पायाभूत ऊर्जा सुविधांवर हा ‘अमानवीय’ हल्ला करण्यात आला आहे. ख्रिसमसच्या दिवशी झालेल्या हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणावर नाश झाला. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. युद्धग्रस्त युक्रेनच्या पॉवर ग्रीडचे आणखी भयंकर नुकसान रशियाने केले आहे.(russia attack )

झेलेन्स्की यांनी ‘एक्स’ वर दिलेल्या निवेदनात, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ख्रिसमसच्या उत्सवाच्या दिवशी जाणूनबुजून युक्रेनच्या ऊर्जा केंद्रांना लक्ष्य केल्याचा आरोप केला.

‘रशियाने केलेला प्रत्येक मोठा पूर्ण तयारीनिशी करत आहे. तो कधीच अचानक घेतलेला निर्णय नसतो. मात्र आजचा हा दिवस पुतिन यांनी जाणूनबुजून निवडला आहे. यापेक्षा अमानवी काय असू शकते?,’असा सवाल झेलेन्स्की यांनी केला आहे.(russia attack )

‘बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसह ७० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि शंभरहून अधिक ड्रोन हल्ले करण्यात आले. लक्ष्य अर्थात आमची ऊर्जा प्रणाली आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे.

काळ्या समुद्रातून रशियन कालिब्र क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याने हवाई हल्ल्याचे सायरन देशभर वाजले.

सुमारे तीन वर्षांपूर्वी युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनला हिवाळ्याचा सर्वांत कठीण सामना करावा लागत आहे. त्यातच या हल्ल्यांमुळे त्यात आणखी एक भर पडली आहे. रशियाने हवाई बॉम्बहल्ले तीव्र केले आहेत; तर त्याचे सैन्य पूर्वेकडील आघाडीवर कूच करीत आहे.

या हल्ल्यात गेल्या २४ तासांत एकाचा मृत्यू झाल्याचे खेरसनच्या गव्हर्नरने म्हटले आहे. हल्ल्यात तिघे जखमी झाले आहेत अतिशीत तापमान असलेल्या निप्रॉपेट्रोव्स्क प्रदेशात या हल्ल्यांनी आव्हानांमध्ये भर घातली आहे. येथील पॉवर ग्रीडवर सातत्याने हल्ले होण्याची भीती गव्हर्नर सेर्गी यांनी व्यक्त केली.

ईशान्येकडील खार्किव शहराला बुधवारी पहाटे क्षेपणास्त्रांचा मोठा फटका बसला. महापौर इगोर तेरेखोव्ह यांनी बॉम्बस्फोटाचे वर्णन ‘मोठा क्षेपणास्त्र हल्ला’ असे केले. शहरातून एकापाठोपाठ एक स्फोट झाले. अनेक ठिकाणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे झाली.

गव्हर्नर सिनीहुबोब म्हणाले की बॉम्बहल्ल्यामुळे अनेक ठिकाणी आगी लागल्या आहेत. दोन व्यक्ती जखमी झाल्या असून त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले आहे. खार्किव शहर रशियाच्या सीमेपासून अवघे ३० किलोमीटर अंतरावर आहे. सलग तीन वर्षे युक्रेन युद्धाचा सामना करत आहे.

हेही वाचा :

आयफेल टॉवरला आग
लष्कराचे वाहन दरीत कोसळून पाच जवांनाचा मृत्यू

 

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00